Aam Aadmi Party celebrated ‘Independence Day’ and Kejriwal’s birthday with enthusiasm
चंद्रपूर :- दरवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील आम आदमी पक्षातर्फे Aam Admi Party बल्लारपूर शहरातील बालाजी वार्ड मधील शांतीनगर भागात ‘ध्वजारोहण’ करून स्वातंत्र्यदिन साजरे Indepence Day करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, पक्ष पदाधिकाऱ्यांसह शहरातील गणमान्य नागरिकांची देखील उपस्थिती होती. ‘Independence Day’ and Kejriwal’s birthday
यानंतर दुसर्या दिवशी 16 ऑगस्ट रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तसेच नागरिकांची कामे करतांना शहराच्या मध्यभागी कार्यालय असावे या विचारातून जिल्हा उपाध्यक्ष प्रा.नागेश्वर गंडलेवार व शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी कार्यालयाची मुहूर्तमेढ करण्याचे ठरविले व झाकीर हुसैन वार्डमधील एकदंत लाॅनसमोर पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शहरातील ज्येष्ठ पत्रकार वसंतराव खेडेकर जी यांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी पहावयास मिळाली. लहान मुलांच्या हस्ते केक कापून केजरीवाल यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
यावेळी शहरातील राजकारणाला आम्ही नक्कीच एक नवीन दिशा देऊ व शिक्षण, आरोग्य तसेच जनतेच्या मूलभूत प्रश्नांना घेऊन काम करू असे पुप्पलवार यांनी जाहिर केले.
या कार्यक्रमात अनेक पत्रकार देखील उपस्थित होते या कार्यक्रमास पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री भुषन ढाकुलकर, तसेच प्रदेश सचिव डॉ. शाहिद जाफरी यांची विशेष उपस्थिती होती.
प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डाॅ. प्रकाश चौकसे, मनोहर माडेकर , अनिल वाग्दरकर , पांडुरंग जरिले , प्रा. बोंडे सर, शैलेश झाडे , नरेंद्र कोरासे, नंदकिशोर भोयर, शंकर जोगे, अरूण भेलके, शंकर काळे, वाजीद खान, रूमाना शेख मॅडम शहरातील या गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती. तसेच आम आदमी पक्षाचे जिल्हा पदाधिकारी, महानगर पदाधिकारी, बल्लारपूर शहर सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह शहरातील नागरिक देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.