Indefinite strike in front of Panchayat Samiti due to exclusion from Gharkul scheme despite eligibility
◆ सचिन सा. तगडपल्लीवार कुर्षी उत्पन्न बाजार समिती संचालक यांनी ठिय्या आंदोलन स्थळी दिली भेट
चंद्रपूर :- पात्र असूनही घरकुलापासून वंचित ठेवले असा आरोप करीत घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी जीबगाव येथील लाभार्थ्यांनी पंचायत समितीसमोर 22 फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सचिन सा तगडपल्लीवार, कुर्षी उत्पन्न बाजार समिती संचालक सावली यांनी ठिय्या आंदोलन स्थळी भेट देत चर्चा केली. मात्र घरकुल मिळेपर्यंत आंदोलन सुरु ठेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
तालुक्यात मोदी आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. जीबगाव येथील दिलीप अशोक पाल व विलास उरकुडा नागापुरे यांना मोदी आवास योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला नाही. अग्रक्रमाने लाभ न देता वा कोणतीही घरकुलांची चौकशी न करता ग्रामपंचायत जीबगाव येथील सरपंच व सचिव यांनी संगमताने आम्ही पात्र असताना डावलले असून अपात्र लाभार्थ्यांना पात्र दाखविण्यात आल्याचा आरोप करीत सावली पंचायत समितीसमोर कुटुंबासह आंदोलन सुरु आहे. आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करून समजविण्याचा प्रयत्न केला तरी मात्र आंदोलन मागे घेणार नाही, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला.
त्यावेळी प्रश्न सोडविण्यासाठी सुधिर भाऊ मुनगंटीवार यांचे कडे पाठ पुरावा करण्यात येवुन लवकर प्रश्न सोडविण्यासाठी येतील असे सांगितले,पण आंदोलक आपली भुमिकेवर ठांब असल्याने,यासंदर्भात वरीष्ठ अधिकारी यांचेशी चर्चा करुन आपण आपल्या पाठीशी असु असे आश्वासन केले आहे.लवर प्रश्न निकाली काढण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले