Monday, March 17, 2025
Homeअपघातमहाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेनेचे A.B.U. कन्स्ट्रक्शनच्या विरोधात बेमुदत...

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेनेचे A.B.U. कन्स्ट्रक्शनच्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण

Indefinite chain hunger strike by Maharashtra State Security Guard Committee and Contract Worker Sena against ABU Construction Company

मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा

चंद्रपुर :- चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील A.B.U. कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार भरत पटेल व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कामगार कल्याण अधिकारी वंजारी यांच्या विरोधात शिवसेनेचे चंद्रपुर जिल्हाप्रमुख व महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेनेचे अध्यक्ष बंडू हजारे तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तसेच शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख, संतोष पारखी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या मेजर गेट समोर आजपासून कामगारांना पूर्व सुचना/नोटिस न देता कामावरून कमी करणे, महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार किमान वेतन/पगार न देणे. तसेच अनेक मुद्द्यासह आज दिनांक 20 फेब्रुवारी पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील A.B.U. कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार भरत पटेल यांच्या कंपनीला C.M.R. यूनिट ८/९ मध्ये A.M.C. कंत्राटमधील कामगारांना पूर्व सुचना/नोटिस न देता कामावरून कमी करण्यात आले. तसेच सदर कंत्राट मालकाची कामगाराचा पैशाच्या भ्रष्टाचार केलेल्या कंत्राटदार व संबंधीत अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी.
त्याचप्रमाणे एबियू कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार भरत पटेल कंपनी मालक व अधिकारी यांचे संगनमताने कामगारांचे शोषण होत असून सदर कंपनी ही प्रोजेक्टमधील काम पूर्ण झाले, तेव्हा कामगाराना पि.एफ. व फायनल पेमेंट नियमानुसार करणे आवश्यक असल्याने ते सर्व कंत्राटी कामगाराचे पैसे भरत पटेल यांनी अधिका-याला हाताशी धरुन स्वतः व संबंधित अधिकारी यांनी विल्हेवाट लावली त्यापैशाची वसूली करुन कामगारांना परत करावी. व सध्या चालू असलेल्या May सिएमआर यूनिट 8/9 या एएमसी कंत्राटामध्ये सन डिसेंबर 2022 ते 2023 पासुन काम करीत असून गेटपास खालील काही लोकांचे गेटपास न बनविता, त्यांना कामावरुन काढून त्यांचे जागेवर कामगारांना लावून पैसे खाण्यासाठी ठेकेदार व संबंधित साईड वरील अधिकारी हयांनी बनविल्याने त्यांचेवर उपासपारीची वेळ येत आहे. त्याकरीता नियमित काम करीत कामागारांचे गेटपास बनविण्यात यावे.

तसेच भरत पटेल व त्या संबंधित अधिकारी यांनी मिळून महिण्याचे 123500/- एवढे पैसे कामगारांचे खाल्ले असून त्याची सक्तीने वसूली करुन त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. तसेच पेमेंट स्लीपमध्ये कामगारांच्या नावावर अॅडव्हांस दाखविला असून हे प्रत्यक्षात मात्र त्यांनी कोणत्याही कामगारांस दिलेला नसुन त्याच्याकडून गेल्या 14 – 15 महिण्याचा कामगारांचे 16 लाख रुपये वसूल करण्यात येवुन सदर कंपनीला काळयायादीत टाकण्यात यावे व कामगारांना त्वरीत कामावर पूर्ववत घेण्यात यावे. अन्यथा बेमुदत साखळी उपोषण आणखी उग्र करण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी कामगार कल्याण अधिकारी, कंत्राटदार व संबधित अधिकारी यांची राहील.असा इशारा शिवसेनेचे चंद्रपुर जिल्हाप्रमुख व बंडू हजारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेनेचे अध्यक्ष बंडू हजारे तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तसेच शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख, संतोष पारखी यांनी दिला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular