Increasing industrial pollution in Chandrapur, Yavatmal and Gadchiroli districts; Sanjeevani Environment Social Organization’s statement to Chief Minister and Governor
◆ संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निवेदन
● राजेश बेले यांनी मांडली व्यथा
चंद्रपूर :- चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक प्रदूषणामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष राजेश बेले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात बेले यांनी म्हटले आहे की, या तीन जिल्ह्यांतील औद्योगिक कंपन्यांकडून होणारे वायू आणि जल प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रदूषणामुळे दमा, हृदयविकार, डोळे, त्वचा, कर्करोग, नवजात शिशु मृत्यू, टीबी आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
बेले यांनी आरोप केला आहे की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव अश्विन धकणे, हवा प्रदूषण नियंत्रण प्रधान दिग्दर्शक वि. एम. मोटघरे, प्रधान वैद्यकीय वैदयानिक अधिकारी विश्वजीत ठाकूर आणि प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी या प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही. उलट, या अधिकाऱ्यांनी कंपन्यांसोबत साठगाठ करून प्रदूषण रोखण्यास टाळाटाळ केली आहे.
बेले यांनी या अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या तीन जिल्ह्यांतील वाढत्या औद्योगिक प्रदूषणाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्य सरकारने या प्रदूषणाला रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.