Thursday, November 30, 2023
Homeआमदारमंगी बु. येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते जिल्हातील पहिल्या सायन्स पार्कचे लोकार्पण...

मंगी बु. येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते जिल्हातील पहिल्या सायन्स पार्कचे लोकार्पण ; सायन्स पार्क विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – आमदार सुभाष धोटे ; चंद्रपूर जिल्ह्य़ात २८ जि. प. शाळेत उभे राहणार ओपन सायन्स पार्क – विवेक जाॅनसन

Inauguration of the first science park in the district by MLA Subhash Dhote at Mangi. Science Park Inspirational for Students – MLA Subhash Dhote.                                                       28 schools in Chandrapur district will Open Science Park to stand in school –  CEO Vivek Johnson.                                                             चंद्रपूर :- राजुरा तालुक्यातील मौजा मंगी बुजृक येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते ओपन सायन्स पार्कचे (विज्ञान बाग) लोकार्पण करण्यात आले. यावेळी सोहळ्यात त्यांचे हस्ते गैव्हिटी चेअर (गुरूत्व खुर्ची) Gravity Chair या वैज्ञानिक प्रतिकृतीचे मान्यवरांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच राजुरा तालुक्यातील एकूण २० जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रतिकृती, माॅडेल विषयी अतिशय सुरेख सादरीकरणासह उपयुक्त माहिती दिली.

सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्तम सादरीकरणाचे, शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले. प्रसंगी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर , मीना साळुंखे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. चंद्रपूर, राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी जि.प. चंद्रपूर तथा प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर, हेमंत भिंगारदेवे, संवर्ग विकास अधिकारी, पं. स. राजुरा, प्रभारी कार्यकारी अभियंता विनोद खापणे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रिकांत बोबडे, सटाले मॅडम , मंगी बु. चे सरपंच शंकर तोडासे, उपसरपंच वासुदेव चापले, भेंडवी चे सरपंच श्यामराव कोटनाके यासह अनेक अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, गनमान्य नागरिक उपस्थित होते.

यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, जिल्ह्य़ातील सर्व ओपन सायन्स पार्क विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. आजपर्यंत नागपूर किंवा अन्य दूर ठिकाणी सहल नेऊन विद्यार्थ्यांना विज्ञान प्रतिकृती दाखवाव्या लागायच्या मात्र आता आपल्या जिल्हात, राजुरा तालुक्यातील मंगी बु व अन्य तीन ठिकाणी अतिशय सुंदर सायन्स पार्क निर्माण होत आहेत. हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड, अभिरुची वृद्धिंगत होण्यास मदत होईल.

तर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅनसन यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्य़ात २८ जि. प. शाळेत ओपन सायन्स पार्क उभे राहणार असून विज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी शालेय क्रीडा तसेच आवश्यक सर्व उपक्रमांना चालणा व प्रोत्साहन देण्यात येईल. शिक्षकांनी राष्ट्र निर्माणासाठी उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यात योगदान द्यावे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी केले. सुत्रसंचालन गीता जाम्बुलवार, ज्योती गुरुनुले यांनी केले तर आभार प्रदर्शन परशुराम तोडासे यांनी मानले. या प्रसंगी राजुरा तालुक्यातील सर्व २० जि. प. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच मंगी बु चे नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular