Saturday, April 20, 2024
Homeआरोग्यजागतिक महिला दिनी 'आसान्या फाउंडेशन' च्या कार्यालयाचे उदघाटन

जागतिक महिला दिनी ‘आसान्या फाउंडेशन’ च्या कार्यालयाचे उदघाटन

Inauguration of office of Asanya Foundation on International Women’s Day

चंद्रपूर :- आसान्या फौंडेशन ही संस्था तळागाळातील लोकांसाठी काम करत आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन आसान्या फाऊंडेशन चंद्रपूर शाखेचे नविन कार्यालया चे उद्घाटन सन्माननीय डाॅ.नम्रता बेंदले (दंत चिकित्सक) यांचे शुभहस्ते, डाॅ. प्रीती ऊराडे (eye specialist), डाॅ.शीला नरवाडे , मा.रीना पाथर्डे, मा.सुनिता अडबाले यांचे प्रमुख उपस्थितीत शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी आयु.सम्राट कांबळे संस्थेचे सक्रिय कार्यकर्ते यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सम्राट कांबळे यांनी उपस्थितांना आसान्या फाऊंडेशन च्या संपुर्ण कार्यप्रणाली तसेच, आसान्या द्वारे चालविण्यात येणारे मुलांमुलींचे वसतीगृह, विविध विषयांत पदवी घेणारे ऊच्च शिक्षणातले विद्यार्थि यांचे बदल महत्वपूर्ण माहीती दिली.

याप्रसंगी डाॅ.नागसेन शंभरकर ,अमित चहांदे नेहमीप्रमाणे अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रम ला आसान्याचे संचालक आनंद देसाई , डॉ. संजय रामटेके, डॉ. विजय सोमकुवर, डॉ. पियुष मेश्राम ,मा.अरविंद वानखेडे, मा.मिलिंद वाळके व प्रशांत चहांदे उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular