Monday, November 11, 2024
HomeSportचोराळा येथे जय बजरंग क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
spot_img
spot_img

चोराळा येथे जय बजरंग क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

Inauguration of Kabaddi Tournament organized by Jai Bajrang Sports Board at Chorala

चंद्रपूर :- जय बजरंग क्रीडा मंडळ, चोराळा तर्फे 60 किलो वजन गट पुरुषांचे कबड्डी स्पर्धेचे आयोजिन करण्यात आले, दिनांक 19 व 20 फेब्रुवारी 2024 असे दोन दिवस या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन एळीवेट कंपनी चे व्यवस्थापक अविनाश लेनगुरे यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख पाहुणे म्हणून देवाळा ग्रामपंचायत सदस्या ज्योतीताई मुळे, सुशिलाताई गौरकार, चोराळा चे पोलीस पाटील शैलेश पिपरे पोलिस पाटील चोराळा, माजी पोलीस पाटील अशोक पाटील ठोंबरे, ज्येष्ठ नागरिक सदाशिव पाटील धोटे, बंडूभाऊ बकाल, विलास चटदुखे कुस्तीपटू, जितेंद्र पिपरे अध्यक्ष जय बजरंग क्रीडा मंडळ चोराळा यांची उपस्थिती लाभली.

कबड्डी स्पर्धेत प्रथम पुरस्कार 20000 रुपये, द्वितीय पुरस्कार 15000, तृतीय पारितोषिक 10000 व चौथे पारितोषिक 5000 रुपये, ठेवण्यात आले असून, अनेक वैयक्तिक पारितोषिक ठेवण्यात आले आहेत.

जय बजरंग मंडळ चोराळा च्या वतीने यूवा कबड्डीपटूना संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

या प्रसंगी मंडळा तर्फे सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

खेळाच्या मैदानात शारिरीक, बौद्धिक, मानसिक, विकास घडतो असे मत लेनगुरे व्यवस्थापक, ऐलिवेट कंपनी चंद्रपूर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचलन श्री.मुन्ना गवळी सर मुख्याध्यापक चोराळा यांनी केले तर आभार प्रदर्शन सौरभ गौरकार यांनी पार पाडले.
.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular