Inauguration of development work and Bhumi Pujan by MLA Subhash Dhote at Antrangao
चंद्रपूर :- राजुरा तालुक्यातील मौजा अंतरगाव येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote यांच्या प्रयत्नाने पूर्णत्वास आलेल्या जिल्हा वार्षिक जनसुविधा योजना अंतर्गत १५ लक्ष रुपये निधीच्या ग्रामपंचायत भावांचे लोकार्पण, लाभार्थी अपंग मुलांना सायकलचे वितरण, तसेच मंजूर सिमेंट काँक्रीट नाली बांधकामाचे भूमिपूजन आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, सरपंच भास्कर कन्नाके, ठाणेदार संतोष वाकडे, विस्तार अधिकारी रवींद्र रत्नपारखी, आनंद नेवारे, ओबीसी काँग्रेसचे धनराज चिंचोलकर, उपसरपंच शितल उपासे, ग्रा. प. सदस्य सुरेखा सलामे, कैलास सिडाम, दशरथ कन्नाके, करडभुजे ताई, चेतन जयपुरकर, अंबादास भोयर यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.