Monday, November 11, 2024
HomePoliticalचंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन : नवीन कार्यकारिणी जाहीर.
spot_img
spot_img

चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन : नवीन कार्यकारिणी जाहीर.

Inauguration of Chandrapur District Congress Office: New executive announced

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन थाटात पार पडले. जिल्हा काँग्रेसचे दैनंदिन कामकाज पाहणे, जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करणे, पक्ष संघटन मजबूत करणे, जनसमस्यांचे निराकरण करणे यासाठी धनराज प्लाझा पहिला माळा, रघुवंशी कॉम्प्लेक्स जवळ, चंद्रपूर येथे जिल्हा काँग्रेसचे हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले असून या कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी नगरसेविका त्रिवेणीताई लहामगे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

यावेळी चंद्रपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, विनायक बांगडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव विनोद दतात्रय, माजी महापौर संगिता अमृतकर, इंटक कामगार नेते के. के सिंग, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, प्रदेश महासचिव अश्विनी खोब्रागडे, ओ.बि.सी काँ. प्रदेश उपाध्यक्ष उमाकांत धांडे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत खणके, माजी नगरसेवक संतोष लहामगे, माजी सभापती दिनेश चोखारे, अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, कार्याध्यक्ष मतीन कुरेशी, महिला काँ. शहराध्यक्षा चंदा वैरागडे, परिवहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश मुंदडा, अनुसूचित जमाती काँ. जिल्हाध्यक्ष प्रमोद बोरीकर, किसान काँ. जिल्हाध्यक्ष दिपक वाढ ई, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, असंघटित कामगार काँ जिल्हाध्यक्ष संदीप सिडा, नगर विकास काँ जिल्हाध्यक्ष रूचीत दवे, चंद्रपूर शहर यु. काँ. जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, माजी शहराध्यक्ष नंदु नागरकर, ओबीसी काँ. प्रदेश महासचिव नरेन्द्र बोबडे, प्रदेश प्रतिनिधी प्रविण पडवेकर, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष शफाक शेख, सौ. सुनिता अग्रवाल यासह जिल्हा काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जननायक राहुलजी गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या परिश्रम आणि मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात काँग्रेसमय वातावरण निर्माण झाले असून यात चंद्रपूर काँग्रेसचेही उत्साहवर्धक सहकार्य असावे या हेतूने चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर केली. येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीत तसेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जवळपास सर्वच जागांवर विजयश्री मिळावी, पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण व्हावे, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साह, उमंग आणि जबाबदारीने चंद्रपूर जिल्हात काँग्रेसचा बालेकिल्ला आनखी मजबूत करावा या उद्देशाने चंद्रपूर जिल्हा काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

यात उपाध्यक्ष पदावर श्री. घनश्याम मुलचंदानी बल्लारपुर, डाॅ. अमिर धम्मानी, नागभिड, जगदीश पिल्लारे ब्रम्हपुरी, श्री. संजय गुलाबराव डोंगरे चिमुर, श्री. विजय चिंतामनराव बावणे कोरपना, श्री. दिनेश चिटनुरवार ब्रम्हपुरी, श्री. लक्ष्मण बोढाले वरोरा, श्री. दिनेश दादाराव चोखारे चंद्रपूर , श्री. बाळु सिमोन चांदेकर दुर्गापुर, श्री. भिमराव पा. मडावी जिवती, अॅड. दिगंबर गुरपुडे नागभिड, श्री. सचिन कत्याल चंद्रपूर, श्री. प्रमोद रघुनाथ चिमुरकर ब्रम्हपुरी, श्री. देवेंद्र बट्टे गोंडपिपरी, या १४ कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून खजिनदारपदी श्री. अंबीकाप्रसाद शांतीलाल दवे चंद्रपूर, महासचिव अब्दुल हमीद अब्दुल गणी राजुरा, डाॅ. श्री. राजेश एम कांबळे ब्रम्हपुरी, श्री. चंद्रशेखर चन्ने सिंदेवाही, डाॅ. अंकुश अर्जुन गोतावडे जिवती, श्री. गजानन तुकाराम बुटके चिमुर, श्री. घनशाम मधुकर येनुरकर मुल, श्री. वसंतराव विधाते वरोरा, श्री. दिलीप टिपले वरोरा, श्री. धनंजय गुडावार भद्रावती, श्रीमती छायाताई मडावी बल्लारपुर, श्री. साईनाथ कोडापे गोंडपिपरी, श्री. मोहनजी जगनाडे नागभिड, सौ. सुनिता लोढीया चंद्रपूर, श्री. दशरथ नामदेव वाकुडकर मुल यांची, महासचिवपदी श्री. विलास बाबुराव विखारे ब्रम्हपुरी , श्री. राकेश यादवराव रत्नावार मुल, श्री. हरिभाउ बारोकर सिंदेवाही, श्री. यशवंत बोरकुटे सावली, श्री. डेविड कामनपल्ली बल्लारपुर, श्री. विलास डांगे चिमूर, श्री. प्रशांतजी बगमारे ब्रम्हपूरी, श्री. कवडु कुंदावार पोंभुर्णा, सौ. सविता टेकाम गडचांदुर, श्री. सुधाकर खोके वरोरा , डाॅ. हेमंज खापने वरोरा, श्री. मोहमद सिद्दीक मो. युसुफ चंद्रपूर, श्री. सुरेश मालेकर कोरपना, श्री. मोहमद शरीफ मो. सयीद राजोली सावली, श्री. अजय मारोतराव उपाद्याय चंद्रपूर, श्री. एजाज अहमद राजुरा, श्री. देविदास सातपुते गोंडपिपरी , श्री. वासुदेव गोपाळा पाल पोंभुर्णा, श्री. भास्कर प. माकोडे बल्लारपुर, श्री. ओमेश्वर पदृमगीरीवार पोंभुर्णा, श्री. लक्ष्मण सादलावार घुग्गुस यांची तर सल्लागार म्हणून अॅडो. पुरूषोत्तम सातपुते चंद्रपूर, अॅडो. मल्लक शाकीर चंद्रपूर, अॅड. विजय मोगरे चंद्रपूर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या कार्यकारिणी मध्ये निमंत्रित सदस्य म्हणून राज्याचे विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार आमदार ब्रम्हपुरी मतदार संघ, श्रीमती प्रतिभाताई धानोरकर आमदार वरोरा, श्री. सुधाकर अडबाले आमदार चंद्रपूर, श्री. अविनाश वारजुरकर माजी आमदार चिमुर, श्री. देवराव भांडेकर माजी आमदार मुल, श्री. विनायक बांगडे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, श्री. सुभाषंिसंह गौर माजी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, श्री. संतोषसिंह रावत अध्यक्ष चं. जि. म. बॅंक मुल, श्री. विनोद दतात्रय माजी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, श्री. प्रकाश पा. मारकवार माजी जि.प अध्यक्ष राजगड मुल, श्री. सतिश वारजुरकर माजी जि.प अध्यक्ष नेरी, श्री. के. के. सिंग दुर्गापुर, श्री. अरूण धोटे माजी नगराध्यक्ष राजुरा, श्री. प्रकाश एम देवतळे माजी जिल्हध्यक्ष चंद्रपूर, श्री. नंदु संभाजी नांगरकर चंद्रपूर यांची निवड करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular