Thursday, February 22, 2024
Homeधार्मिकधम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे दीक्षाभूमीवरील स्टालचे उद्घाटन

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे दीक्षाभूमीवरील स्टालचे उद्घाटन

Inauguration of Bahujan Employees Federation of India stall at Dikshabhoomi on the occasion of Dhammachakra Pravartan Din.                                                चंद्रपूर :- डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 15 आणि 16 आक्टोबर 1956 ला चंद्रपूर येथील दीक्षा भूमी वर आपल्या लाखो बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.  67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने दीक्षा भूमी परिसर येथे संघटनेचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने जनजागृती स्टाल लावण्यात आला. Inauguration of Bahujan Employees Federation of India stall at Dikshabhoomi on the occasion of Dhammachakra Pravartan Dina

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर, संघटनेचे संस्थापक स्मृतीशेष श्रीकृष्ण उबाळे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या नंतर स्टालचे उद्घाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर न्याशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स बानाईचे चंद्रपूरचे सचिव इंजिनिअर किशोर सवाने यांच्या हस्ते 15 आक्टोबरला संपन्न झाले.

अध्यक्षस्थानी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे हे होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ.प्रा.टी.डी.कोसे, राज्याचे अध्यक्ष प्रा.शेषराव रोकडे, राज्याचे सचिव सिद्धार्थ सुमन, राज्याचे सहसचिव नवनाथ देरकर, कर्नाटक राज्याचे संघटक प्रफुल्ल चिमूरकर बंगलोर, डॉ बाबासाहेब आंबेडकर लायर्स असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष एड.पुनमचंद वाकडे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा संघटक पी.एम.जाधव, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ.प्रा.स़ंजय रामटेके,, उपाध्यक्ष डॉ.प्रा.विजय सोमकुंवर, जिल्हा सहसचिव सुधाकर तेलसे, विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार युनियनचे शाखाध्यक्ष नितिन वाढई, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशनचे जिल्हा कोषाध्यक्ष प्रा.मनोज निरंजने,  शहर संघटन सचिव  आशिष गेडाम,शहर सचिव प्रा.भाऊराव मानकर जिल्हा ,संघटक डॉ .प्रा.प्रकाश बोरकर  , जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ ‌.प्रा‌ .शोभा गायकवाड, डॉ.प्रा‌ . ज्योत्स्ना रामटेके, डॉ.प्रा.राजेश डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र  देवगडे, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशनचे वरिष्ठ सदस्य मुन्ना आवळे, सुरेश शंभरकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सचिव संजय खोब्रागडे यांनी तर आभारप्रदर्शन शहर कोषाध्यक्ष दिपक जुमडे यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular