inauguration ceremony of ‘Vari Prabodhana’ was concluded with great enthusiasm
चंद्रपूर :- आज दि. 11 ऑगस्ट रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधी स्थळावर आज ‘प्रबोधनाची वारी’ चा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. Foot March of Enlightenment
प्रबोधन सम्राट आणि सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या हस्ते या वारीचा शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या हस्ते तिरंगा ध्वज दाखवून प्रबोधनाच्या रथाला प्रारंभ करण्यात आला.
“वारी प्रबोधनाची” अभियान महाराष्ट्रातील सर्व सप्तखंजिरी वादक प्रबोधनकार मंडळींनी सामूहिकपणे स्वीकारले असून, याचे उद्दिष्ट आदर्श गाव निर्मिती आणि राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार करणे आहे. या अभियानाची सुरुवात प्रथम चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातून होत आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधनाचे स्फुल्लिंग चेतवले गेले आहे. inauguration ceremony of ‘Vari Prabodhana’
या प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, मा. इंजि. भाऊसाहेब थुटे, रवी दादा मानव,मा. नरेंद्रभाऊ जीवतोडे, संदीपपाल महाराज, रामपाल महाराज, राज घुमणार, आस्वले गुरुजी, गव्हाळे गुरुजी सर्व सप्तखंजेरी वादक संघ या कार्यक्रमाला उपस्तिथ होते
वारी प्रबोधनाची अभियान महाराष्ट्रातील सर्व सप्तखंजिरी वादक प्रबोधनकार मंडळींनी सामूहिकपणे स्वीकारले. या अभियानाचे उद्दिष्ट आदर्श गाव निर्मिती आणि राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार करणे आहे. या सोहळ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधनाचे स्फुल्लिंग चेतवले गेले आहे.
या सोहळ्याने समाजाच्या विकासासाठी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करण्याच्या दिशेने एक नवा अध्याय सुरू केला आहे.