Sunday, April 21, 2024
Homeपोलीसचंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने कलम 36 लागू

चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने कलम 36 लागू

In order to maintain law and order in Chandrapur district, Article 36 is applicableचं चंद्रपूर :- जिल्ह्यात 15 व 16 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन, तसेच दि. 15 ते 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत नवरात्रोत्सव (दसरा,रावणदहन/पुजापाठ, कोजागिरी, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन) तसेच दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी क्रांतीवीर बाबूराव पुलेश्वर शेडमाके यांचा पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 15 ऑक्टोबरच्या रात्री 12 वाजतापासून ते 29 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू करण्यात येत आहे. In order to maintain law and order in Chandrapur district, Article 36 is applicable

या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविण्याबाबत,सभेचे आयोजन व मिरवणूक काढण्याबाबत, त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊड स्पीकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी कळविले आहे.

हे आहेत पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांचे अधिकार:

मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पूजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीस निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पूजास्थळी लोकांच्या वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे आदी निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लाऊड स्पीकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, तसेच कलम 33, 35,37 ते 40,42,43 व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे. In order to maintain law and order in Chandrapur district, Article 36 is applicable

सदर आदेश लागू असतांना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजवणे, लाऊड स्पीकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी. सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सदर आदेश दि. 15 ऑक्टोबरचे रात्री 12 वाजेपासुन ते दि. 29 ऑक्टोबर 2023 च्या रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहील,असे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular