In Chandrapur, a Thar vehicle broke ATM; Ramnagar Police arrested the accused from Hyderabad, Haryana
चंद्रपूर :- शहरातील बंगाली कॅम्प चौकातील दुर्गा माता मंदिर जवळील बँक ऑफ इंडिया चे एटीएम फोडणाऱ्या ATM Broker आरोपींना रामनगर पोलीसांनी हैदराबाद व हरियाणा येथील मेवात येथून अटक करीत गुन्ह्यात वापरलेली थार चारचाकी वाहन व एक स्प्रे बॉटल असा एकूण 14,00200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी हुसेन अली वय 21 वर्ष, रा. पटेल वाडा, आमीरपेठ, हैदराबाद व तस्सी उर्फ तस्लिम उदय खान वय 26 वर्ष, रा. सीरोली, जिल्हा मेवात, राज्य हरियाणा यांना अटक करण्यात आली. Crime News
रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बंगाली कॅम्प चौकातील दुर्गा माता मंदिराजवळील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडत असल्याची माहिती रामनगर पोलीसांना प्राप्त झाली, त्यावरून रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल होत तपासणी केली असता एटीएम चा सायरन वाजत असून सीसीटीव्ही कॅमेरे वर स्प्रे करून कॅमेराचे वायर तोडून असल्याचे निदर्शनास आले.
रामनगर पोलीसांनी Ramnagar Police Station गुन्हा नोंद करून तपासात घेत, पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी गुन्हे शोध पथकाला पाचारण करीत पुन्हा घटनास्थळी रवाना करीत तपास करण्यास दिला.
पथकाने घटनास्थळीचे सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासले असता एका चारचाकी थार वाहनात काही अज्ञात व्यक्ती एटीएम ची चोरी करण्यास आल्याचे निदर्शनास आले.
त्यावरून रामनगर गुन्हे शोध पथकाच्या पोलीसांनी विविध पथक तयार करीत थार वाहनाचा पाठलाग करीत सीसीटीव्ही च्या आधारे टोल नाके तपासून नागपूर व हैदराबाद येथे आरोपींचा शोध घेतला यावरून हैदराबाद येथून आरोपी हुसेन अली याला ताब्यात घेत कसून चौकशी करीत माहिती काढली, त्यावरून आरोपी मो. आरिफ उर्फ अरमान मलिक रा. हैदराबाद, तस्सी उर्फ तस्लिम उदय खान,रशीद खान दोन्ही रा. सिरोली, मेवात, हरियाणा, सल्ली उर्फ सलमान रा. भोंड, फिरोजपुर, मेवात, हरियाणा यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.
यावरून हैदराबाद येथे मो. आमिर उर्फ अरमान मलिक याचा शोध घेतला असता आढळून आला नाही, उर्वरित आरोपींचा शोध हरियाणा, दिल्ली येथे घेतला असता आरोपी आढळून आले नाही, परंतु आरोपी तस्सी उर्फ तस्लिम उदय खान गुरुग्राम येथे आढळून आला, तिथून रामनगर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने त्याला ताब्यात घेतले.
आरोपींची कस्टडी रिमांड घेत गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची थार वेगवेगळ्या नंबर प्लेट वापरून चोरी कामासाठी वापरत असल्याचे कळले त्यावरून टी एस 31 जे 2299 थार वाहन जप्त करण्यात आले, याआधी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तसेच नागपूर जिल्ह्यातील 4 एटीएम तोडून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न व मोबाईल शॉपी फोडल्याचे कबूल केले.
गुन्हे शोध पथकाचे पोउपनी मधुकर सामलवार यांनी तसेच येथिल अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा व गुन्हयात वापरलेल्या काळया रंगाच्या थार गाडीचा शोध घेणे कामी अतिशय परिश्रम घेवुन तांत्रिक पध्दतीने कौशल्यपुर्ण तपास करून आरोपीतांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी, सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गाडे, पो.नि. यशवंत कमद तसेच गुन्हे शोध पथक, रामनगर सपोनि देविदास नरोटे, पोउपनि, मधुकर सामलवार, पोउपनि दिपेश ठाकरे, पोहवा सिडाम, रजनिकांत पूट्टेवार, किशोर, शरद, सतिश अवथरे, आनंद खरात, प्रशांत, लालु, हिरालाल, रविकुमार, प्रफुल, संदिप, विकास, विकास जाधव, पंकज, मोरे पोलीस स्टेशन, रामनगर तसेच सायबर पोस्टे, चंद्रपुर येथील नापोशि/छगन, पोशि/वैभव, भास्कर, राहुल, उमेश यांनी सहकार्याने कार्यवाही केली आहे.