Tuesday, November 5, 2024
HomeEducationalनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी करता विद्याशाखा निहाय्य दिशा निर्देश व...
spot_img
spot_img

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी करता विद्याशाखा निहाय्य दिशा निर्देश व मार्गदर्शक तत्वे प्रकाशित करा : गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनची मागणी.

Publish faculty wise guidelines and guidelines for effective implementation of the new National Education Policy.
Demand of Gondwana University Young Teachers Association.

• गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनची मागणी

  • चंद्रपूर :- शैक्षणिक सत्र 2024 -25 पासून नवीन शैक्षणिक धोरण National Education पोलिसी लागू करण्याचे शासनाचे निर्देश असून गोंडवाना विद्यापीठाने सुद्धा नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. या आधी सुद्धा शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण राबवण्याचे स्पष्ट आणि सक्तीचे आदेश दिले आहे. नवीन शैक्षणिक धोरण लागू करणे क्रमप्राप्त असल्याने विद्यापीठांतर्गत सलग्नित महाविद्यालये सुद्धा धोरण लागू करण्याकरिता तयार आहे.>>  6 ट्रॅक्टर जप्त तर 6 जणांवर गुन्हे दाखल

मात्र विद्यापीठात विविध विद्या शाखेंतर्गत तयार करण्यात आलेले अभ्यासक्रमाचे अंतिम प्रारूप व रचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अधिकृतपणे दर्शवण्यात आले नसल्यामुळे संलग्नित महाविद्यालयांना नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहे. तरी गोंडवाना विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात विविध विद्याशाखे अंतर्गत अभ्यासक्रमातील दिशा निर्देश व मार्गदर्शक तत्त्वांची अंतिम रचना व प्रारूप तयार करून विद्यापीठाच्या पोर्टलवर तातडीने टाकावे अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने Gondwana University Young Teachers अससोसिएशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे कडे केली आहे. शहर पोलिसांच्या धाडीत 33 हजारांचा मुद्देमाल जप्त

मागील सत्र 2023- 24 हे संपत असल्याने नवीन शैक्षणिक धोरणाबाबत अभ्यासक्रमाची स्पष्टता अंतिम झाली नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून सत्र 2024-25 पासून येणाऱ्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना माहिती देणे अशक्य होणार आहे. 1 मे पासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यामध्ये प्राध्यापकांना अडचणी निर्माण झाल्या असून सुट्ट्या लागल्याने प्राध्यापक महाविद्यालयात उपस्थित राहू शकत नाही.
त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण अभ्यासक्रमाची रचना व प्रारूप विद्यापिठा मार्फत त्वरित पाठविणे आवश्यक आहे.

उपरोक्त सर्व बाबींचा आणि घटकांचा गांभीर्यपूर्वक विचार करून नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत अंतिम झालेल विविध विद्या शाखेमधील अभ्यासक्रम तथा दिशानिर्देश व मार्गदर्शक तत्वेअधिकृतपणे पोर्टलवर प्रकाशित करावा अशी मागणी गोंडवांना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने केली असून या शिष्टमंडळामध्ये गोंडवाना यंग टीचर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय गोरे, सचिव डॉ.विवेक गोर्लावार, सिनेट सदस्य डॉ. सतीश कन्नाके, नुटाचे सिनेट सदस्य डॉ.प्रवीण जोगी, डॉ.किशोर ठाकरे तथा संघटनेच्या अनेक सदस्यांचा समावेश आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular