Illegal liquor worth lakhs seized in Gadchiroli district
Strike operation of local crime branch
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेने LCB चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या दारूचा साठा जप्त केला यात पिकअप वाहनासह 15,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 आरोपीना ताब्यात घेत पुढील कारवाई करिता मूल पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. Illegal liquor transport
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथकातिल सपोनि गदादे, पोउपनि भुरले व पोलीस स्टॉफ असे पोलीस स्टेशन, मुल परिसरात दिनांक 17 मे 2024 रोजी पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमिदाराकडुन माहिती मिळाली की, एक महिंद्रा कंपनीची पिकअप चारचाकी वाहन मध्ये अवैधरित्या देशी दारूची पोस्टे मुल परिसरातील चिरोली ते सुशी मार्गाने गडचिरोली जिल्हयात वाहतुक करीत आहे. Crime
प्राप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी करून वाहनास ताब्यात घेवुन वाहनाची झडती घेतली असता, वाहनामध्ये 250 नग खर्डाचे खोक्यात प्रत्येक खोक्यात 100 नग प्रमाणे एकुण 25,000 नग देशी दारू राकेश संत्रा कंपनीच्या प्रत्येकी 90 एम.एल. ने सिलबंद भरलेल्या प्रत्येकी 35 रुपये प्रमाणे एकुण किमंत 8,75,000 रूपयाचा मुद्देमाल तसेच गुन्हयात वापरलेली महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. 33 टि. 2014 किमंत 7,00,000/- रूपये असा एकुण 15,75,000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यातील आरोपी करणसिंग ओमकारसिंग पटवा, वय 29 वर्ष, रा. गुरुव्दार जवळ, मुल, चंद्रपुर v मनोजकुमार जगदीश मुजुमदार, वय 39 वर्ष, रा. बंगाली कॅम्प, एटापल्ली, जि. गडचिरोली यांना वाहतुक करीत असतांना मिळालेल्या देशी दारू बाबत विचारणा केली असता, त्यांनी सदर देशी दारूचा माल हा नामे अमोल रामदास ढोरे, रा. मुल, चंद्रपुर याचे मालकीचा मौजा चिरोली ता. मुल, जि. चंद्रपुर येथील देशी भट्टी मधुन चार चाकी वाहनामध्ये भरून दिल्याचे सांगितले. Illegal liquor worth lakhs seized in Gadchiroli district
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल एकरे, सपोनि पंकज बोनसे, सपोनि मनोज गदादे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा जयंता चुनारकर, किशारे वैरागडे, रजनिकांत पुठ्ठावार, सतिश अवथरे, चेतन गज्जलवार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.