Hundreds of Cstps workers joined the NCP party. चंद्रपूर :- चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र Cstps येथील कोळसा हाताळणी विभागातील कंत्राटी कामगारांनी आज सामुहिकपणे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश घेतला.

दुर्गापुर येथील गौरकार सभागृह येथे झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनीलभाऊ काळे, रॉका प्रणित पॉवर फ्रँट संघटनेचे अध्यक्ष युवराज भाऊ मैन्द, रवि भाऊ टाकसाळे, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, माजी सरपंच अमोल ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले उपस्थित होते. Hundreds of Cstps workers joined the NCP party
यावेळी प्रवेश करणाऱ्या कामगारांनी मागील १५ वर्षांहून अधिकचा काळ चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटात काम करत असताना सन २०१७ पासून अधिकारी व कंत्राटदाराने संगनमताने केलेल्या अन्यायाची वाच्यत्या केली. व कामगारांवर होत असलेल्या आर्थिक व मानसिक शोषणाचा निषेध केला तर अधिकारी यांचे तर्फे कामावरून काढण्याची धमकी देत गेटपास जप्त करण्यात येते असे सांगितले.
या अन्यायाच्या संदर्भाने कामगारांनी अनेकदा पत्रव्यवहार केले, अनेक राजकिय व कामगार संघटनांशी सहकार्याची अपेक्षा केली मात्र कुणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. याउलट कमी कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॉवर फ्रंट कामगार संघटनेने कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले असल्याने सर्व कामगारांनी विश्वास करीत आज सामुहिकपणे प्रवेश घेतला.
यावेळी उर्जानगर ग्रामपंचायत सदस्य अनुकूल खन्नाडे, विचोडा ग्रामपंचायत सदस्य अंकित ढेंगारे, राहुल भगत, विशाल नायर, राहुल भगत, सौरभ घोरपडे, पियुष चांदेकर, अमर गोमासे, निलेश टोंगे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये सुरेंद्र टिकले, प्रशांत मकासर, विकास दत्ता, राहुल मेश्राम, असीम मंडळ, सुरेंद्रजी चौरे, धनपाल खोब्रागडे, उल्हास टोंगे, विजय कांबळे, विश्वपाल नैताम, मंगेश मेश्राम, धम्मदीप दहिवले, अरुण चौधरी, दीपक दहिवले, अमित मडावी, नागराज पोहेकर, मनोज डवरे, विजय राय, प्रकाश मेश्राम, नागेश मेश्राम, नारायण मंडल, तमन विश्वास, परशुराम कावडे, माणिक बनसोड, कमलदास जगन, जोगेंद्र नौकरकर, भक्तदास पाटील, मिलनबाई पटेल, उत्तम मेश्राम, कुणाल रामटेके, सुरेंद्र गजभिये, यशवंत सरोदे, दिवाकर खोब्रागडे, मयूर परतेकी, राकेश कन्नाके, विकास कोठूनाके पवन कन्नाके इत्यादी कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.