Honored with the Rajubhau Yele Demokratar Annabhau Sathe Award
चंद्रपूर :- साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांशी बांधिलकी राखत मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाकरिता सातत्याने प्रयत्नरत असलेले भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजुभाऊ येले यांना दि. १२ मार्च, २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन २०१९-२० चा साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथील नॅश्नल सेंटर फॉर फार्मसी, आर्ट्स अॅन्ड सायन्स (NCPA) जमशेद टाटा नाट्यसभागृहात आयोजित या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडा व सांस्कृतिक मंत्री संजय बन्सोडे, माजी सामाजिक न्याय मंत्री संजय सावकारे, चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त पुणे ओमप्रकाश बकोरीया आदींच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देवून श्री येले यांना सन्मानित करण्यात आले.
त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील यशस्वीतेकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.