Hema Malini gave the message of nature conservation through dance:
Appeal for Ganga river conservation, protection
0 ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील ताडोबा महोत्सवाचा थाटात समारोप
चंद्रपूर :- जल -जीवन -जंगल -नद्या वाचविण्यासाठी सामान्य नागरिकांनी पुढे येण्याचा संदेश देत अभिनेत्री, नृत्यांगना, खासदार हेमा मालिनी यांनी साकारलेल्या गंगा बॅलेने चंद्रपूरच्या ताडोबा महोत्सवाचा रविवारी थाटात समारोप झाला.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर येथील चांदा क्लब मैदानावर तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन पार पडले. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी चंद्रपूरकरांना मिळाली. एका उत्कृष्ट,नियोजनबद्ध आणि आगळ्या वेगळ्या आयोजनासाठी हा महोत्सव चर्चेत राहिला. यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी अभिनेत्री नृत्यांगना हेमामालिनी यांना बांबूची बासरी देऊन स्वागत केले.

युगानूयुगे भारतीयांच्या श्रद्धेचे केंद्र असलेली गंगा नदी व तिच्या धार्मिक अध्यात्मिक व सामाजिक सहजीवनाचा प्रवास प्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना हेमामालिनी Hema Malini यांनी परिणामकारक पध्दतीने मांडला. गंगा बॅलेच्या Ganga Balle सादरीकरणाने चंद्रपूरकर अक्षरशः मंत्रमुग्ध झालेत.
गेले तीन दिवस शहरातील चांदा क्लब मैदानावर कार्यक्रम सुरू होते. तीन दिवसीय ताडोबा महोत्सव रसिकांची मोठ्या संख्येतील उपस्थिती होती . (रविवारी) नृत्य कलेला मिळालेली रसिकांची उत्स्फूर्त दाद, याने या नृत्याविष्काराला बहार आणली.