Bhushan Phuse extended a helping hand to the families of those who died in the accident
चंद्रपूर :- दिवसभर मजुरी करून बाजारात जाण्याकरिता पायदळ निघालेल्या साईनाथ सुरकर यांना एका बाईकने मागून धडक दिली. झालेल्या अपघातानंतर जखमी साईनाथला गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. पण यावेळी डॉक्टरच उपस्थित नव्हते. अनेक वेळपर्यंत वेदनेने कण्हत असलेल्या साईनाथला शेवटी गोंडपिपरी च्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला. Accident
प्रशासकीय अनास्थेने एका निष्पाप शेतमजूरचा बळी गेला. हा मुद्दा समोर आला.अनं यानंतर समाजमनात संताप पेटला. खात्यात आले दहा लाख,.. असाही प्रामाणिकपणा
अतिशय गरीब कुटूंबातील कर्त्या पुरुषाच्या निधनाने कुटुंबियांवर आभाळ कोसळले. साईनाथ ला अथर्व व अनमोल अशी दोन लहानशी मुल आहेत. या आपल्या मुलांचं कस होणार या चिंतेने पत्नी वैशाली आसवांच्या गर्गेत बुडाली.
एका गरीब कुटुंबावर आलेलं संकट, त्यांची झालेली वाताहात समोर आली.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी साईनाथ सुरकर यांच्या भंगारपेठ येथील घरी जात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. कुठलीही अडचण असली तरी सांगा आपण मदतीसाठी तत्पर असू अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर त्यांनी वैशाली सुरकर व त्यांच्या दोन्ही मुलांना आर्थिक मदत दिली.
दरम्यान काहीही चूक नसतांना एका शेतमजूराचा बळी गेला. उपचाराअभावी हा प्रकार घडल्याने दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.