Help the government to do agriculture – Dr. Ankush Aglave; A statement to the Vice-Chancellor Punjab Rao Agricultural University. वरोरा :- आंतरराष्ट्रीय कापुस दिनाचे औचित्य साधून पिडीकेव्ही इंडो काउंट कापूस उत्कष्टता प्रकल्प, कृषी संशोधन केंद्र एकार्जुना येथे नुकतेच कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमात पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद घटाक व अधिकारी वर्गाची चमु उपस्थित होते. Help the government to do agriculture – Dr. Ankush Aglave ; A statement to the Vice-Chancellor Punjab Rao Agricultural University
कुलगुरू घटाक यांनी विविध प्रकल्पांना भेटी देवून समस्या जाणून घेतल्या. एकार्जुना प्रकल्पाची काम उत्कृष्ठ असल्याची ग्वाही यावेळी दिली. पालकमंत्री तथा सांस्कृतिक व वने मंत्री सुधीरभाऊ यांनी पंजाबराव कृषी विद्यापीठास वेळोवेळी मदत केली तथा तीन करोडचा फंड दिला असल्याचे यावेळी सांगितले. Help the government to do agriculture – Dr. Ankush Aglave ; A statement to the Vice-Chancellor Punjab Rao Agricultural University

कुलगुरू यांनी सांगितले की, विदर्भातचा शेतकरी एका एकर मध्ये जवळपास 5 क्विंटल कापुस उत्पादन करतो यापेक्षा अधिक कापुस कसे उत्पादन करता येईल यावर देखील भर देवून विदेशाच्या धरतीवर एका एकरात 20 क्विंटल कापूस उत्पादन करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. आगलावे यांनी मराठवाडा व खान्देशातील शेतकरी यांचे उदाहरण देवून बगायती शेती कशी करता येईल व शेती ओलीताखालील आणण्यास काय उपाययोजना करावे लागून कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल याकरीता कुलगुरू घटाक यांना निवेदन दिले आहे. यावेळी एकार्जुना येथील शेतकरी बांधव व कृषी संशोधन केंद्र, एकार्जुुना येथील अधिकारी वर्ग उपस्थित होते.
