Heavy rain in Chandrapur Babupeth area flooded, water entered many houses
चंद्रपूर :- पावसाळा सुरु झाला परंतु जुलै महिना अर्धा झाला तरीही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही जणू चंद्रपूरकडे पावसाने पाठ फिरवली होती परंतु आज संध्याकाळी चंद्रपुरात पावसाने धुवाधार बॅटिंग केली. यामुळे बाबुपेठ परिसरातील समता चौक भागातील नागरिकांच्या घरात पावसाने पाणी शिरले.
हवामान खात्याकडून IMD चंद्रपूर जिल्हाकरिता 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट Orange Alert देण्यात आलेला असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे, तरी नागरिकांनी सतर्क रहावे असे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज आवाहन करण्यात आले होते. Heavy rain in Chandrapur

आज संध्याकाळी धुवाधार बरसणाऱ्या पहिल्याच पावसामुळे बाबुपेठ परिसरातील समता चौकातील बऱ्याच नागरिकांच्या घरात पाणी शिरले, यामुळे बऱ्याच नागरिकांच्या अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Babupeth area flooded, water entered many houses
चंद्रपूर महानगर पालिकेच्या MNC नालीसफाईच्या दुर्लक्षितपणामुळे असा प्रकार घडला असा आक्षेप स्थानिक नागरिकांनी घेतला आहे. मनपा प्रशासनाने आतातरी नालेसफाई कागदावरच न करता प्रत्यक्षात करावी अशी मागणी स्थानिक पीडित नागरिकांनी केली आहे.