15th August is not just a date but a day of India’s glory – Minister Sudhir Mungantiwar ‘Har Ghar Tiranga’ Tribute Bike Rally, Ended with Excitement with Huge Participation
चंद्रपूर :- स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे लोकनेते विकास पुरुष ना. सुधीर मुनगंटीवार वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन हर घर तिरंगा सन्मान बाईक रॅली काढण्यात आली. Har Ghar Tiranga’ Tribute Bike Rally
या बाईक रॅलीमध्ये असंख्य युवक, सामाजिक संघटना, खेळाडू, महिला वर्ग, भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून देश हिताकरिता तिरंग्याच्या सन्मानाकरीता, विश्वगौरव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत चंद्रपूर शहर महानगरातील नागरिकांनी हर घर तिरंगा बाईक रॅलीला उपस्थिती दर्शविली.
हर घर तिरंगा रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महापुरुषांना अभिवादन करत पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे सोबत सर्व धर्मांचे धर्मगुरु व एक्स आर्मी ऑफीसर यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रथामध्ये चंद्रपूर शहर महानगरात मोठ्या उत्साहात बाईक रॅली संपन्न झाली.
या तिरंगा रॅलीला यशस्वी करण्याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिका-यांनी मेहनत घेतली. यामध्ये प्रामुख्याने राहुल पावडे, जिल्हाध्यक्ष महानगर, महामंत्री डॉ. मंगश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे, रामपाल सिंग, भाजप नेते प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, संजय कंचर्लावार, संदिप आवारी, भारती दुधानी, रुद्रनारायण तिवारी आदिंची प्रामुख्याने उपस्थितीत होती.
हर घर तिरंगा सन्मान रॅली यशस्वी करण्याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, महामंत्री यश बांगडे, गणेश रामगुंडावार, सतिश तायडे, पप्पू बोपचे, छबुताई वैरागडे, युवती प्रमुख मुग्धा खांडे, तृष्णा गेडाम, जयश्री आत्राम, मनोज पाल, अजय सरकार, विद्यार्थी आघाडी तेजस अलवालवार, क्रीडा आघाडी प्रमुख रामनारायण रविदास, मंडळ अध्यक्ष आकाश ठुसे, आशिष बोंडे, हेमंत सिंघवी, स्नेहीत लांजेवार, प्रविण गुर्रमवार, सोहम बुटले, सागर दास, राहुल पाल, मनिष पिपरे, सचिन यामावार, दिपक हुड, हर्ष पोपट, दर्शन बेले, पार्थ कंचर्लावार, गजानन भोयर, करण नक्षिणे, गणेश बानकर, यश ठाकरे, शुभम कायल, मनोज जाधव, प्रसिध्दी प्रमुख सागर गटलेवार यांनी अथक परिश्रम घेतले.