Thursday, April 24, 2025
HomeAssembly Electionहंसराज अहीर यांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद

हंसराज अहीर यांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद

Hansraj Ahir’s interaction with office bearers and workers of Lalpeth, Tukum, Sanjaynagar

चंद्रपूर :- विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीची सत्ता स्थापित करण्यासाठी भाजपा महायुतीचे उमेदवार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांच्या प्रचार मोहिमेकरीता भाजपाच्या वतीने तुकूम येथे दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीस पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir व भाजपा उमेदवार किशोर जोरगेवार यांनी उपस्थिती दर्शवून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले. Hansraj Ahir’s interaction with office bearers and workers

लालपेठ वार्डामध्ये BJP भाजपाद्वारे आयोजित प्रचार रॅलीमध्ये हंसराज अहीर यांनी सहभागी होवून नागरिकांशी संपर्क साधला. तुकूम येथे भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीस मार्गदर्शन करून महायुतीचे विकासाभिमुख सरकार सत्तेवर आणण्याकरिता कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाकरिता परिश्रम घ्यावे असे आवाहन सुध्दा त्यांनी उपस्थिताना केले.

चंद्रपुरातील संजयनगर परिसरात भाजपाद्वारा जनसंपर्क प्रयोजनार्थ काढलेल्या पदयात्रेत अहीर यांनी सहभाग घेतला. दरम्यान लोहारा येथील उज्ज्वल गौरक्षण केंद्रास भेट देवून त्यांनी दीपोत्सव प्रित्यर्थ आयोजित अन्नकुट कार्यक्रमास हजेरी लावून गौरक्षण केंद्राच्या कार्याची प्रशंसा केली.

या कार्यक्रमास अनिल फुलझेले, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, विठ्ठलराव डुकरे, भाजपाच्या महिला अध्यक्ष सौ. सविताताई कांबळे, मायाताई मांदाडे, शिलाताई चव्हाण, मायाताई उईके, पुरूषोत्तम सहारे, दिनकर सोमलकर, माजी नगरसेवक श्याम कनकम, राजु कामपेल्ली, गणेश गेडाम, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, माजी नगरसेविका ज्योती गेडाम, श्रीनिवास रंगेरी, सुदामा यादव, रामा भंडारी, संजय मिसलवार, श्रीनिवास येरकल, जुपाका गट्टया, दोमती भुमन्ना, लिलावती यादव, सुदाक्का, सिताक्का, तिरमलाक्का दोमटी, श्रीनिवास कामपेल्ली, रमेश पुलीपाका, रवी कडम, कन्नया यादव, श्रीनिवास जुनमुलवार, कविता कनकम यांचेसह भाजप पदाधिकारी, शक्तीकेंद्र, बुधकेंद्र प्रमुख व भाजपचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular