Hansraj Ahir on Bhima Jayanti Tribute to Dr. Babasaheb Ambedkar
चंद्रपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांनी चंद्रपूर शहरातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली वाहीली. Bhim Jayanti

याप्रसंगी चंद्रपूरचे माजी उपमहापौर अनिल फुलझेले, मातंग समाज नेते राजू येले, भाजपा ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य विनोद शेरकी, इंजि. संजय खनके, श्रीकांत भोयर, पुनमचंद तिवारी, स्वप्नील मून, राहूल सुर्यवंशी, प्रविण चुनारकर, सुदामा यादव, राजू यादव, रामप्रवेश यादव, चेतन शर्मा, सुमित बाकरवाले यांचेसह उपस्थित कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस वंदन करून त्यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण केली.