Hansraj Ahir honors Mayur Deuramalle who has cycled 18 thousand kilometers
चंद्रपूर :- 2 मार्च ते 4 ऑगस्ट 2024 पर्यंत 12 ज्योतिर्लिंग 4 धाम व सप्तपुरी असा 18 हजार किमी. चा सायकलने खडतर व धाडसी प्रवास करणाऱ्या पोंभुर्णा तालुक्यातील घनोटी नं. 1 या गांवातील 23 वर्षीय मयुर महादेव देऊरमल्ले या युवकाचा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांनी जनसंपर्क कार्यालयात शाल व पुष्पगुच्छ देवून यथोचित सन्मान केला.
याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवी दामोदर मंत्री, कमल स्पोर्टीग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर, शिव सारडा, शामल अहीर, राम आईटलावार, राजवीर चौधरी, अॅड. प्रशांत घरोटे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मयुर देऊरमल्ले बीएस्सी (एग्री) असून छत्रपती शिवरायांच्या विचाराने प्रेरीत हा युवक धार्मीक व निसर्गप्रेमी आहे. यापुर्वी त्यांनी सायकलने चंद्रपूर ते अयोध्याधाम प्रवास करून रामललाचे दर्शन घेतले होते. हंसराज अहीर यांनी त्याला भावी उज्वल यशाचा शुभेच्छा दिल्या.