Hang the accused in the case of rape and murder of a young woman
आरोपीला फासी द्या – मातंग समाजबांधवांची मागणी
चंद्रपूर :-मुंबई येथील मातंग समाजातील पुनम क्षीरसागर या 26 वर्षीय युवतीवर अमानुष बलात्कार व खून करुन तिचा मृतदेह खाडीत फेकुन देणाऱ्या निजामुद्दीन शेख या नराधम आरोपीवर कठोर कारवाई करुन त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी या मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा मातंग समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.>> बियर शॉपी च्या लायसन्स साठी 1 लाखाची मागणी… मग
आज दिनांक 8 मे, 2024 रोजी संघटनेच्या मार्गदर्शक, माजी नगरसेविका श्रीमती रत्नमाला बावने यांच्या नेतृत्वात संघटनेचे पदाधिकारी राजु येले, अरुणकुमार कांबळे, प्रशांत डोंगरे, साजन चहारे, राहुल पडघाने, रवि डोंगरे, सौ. रोशनी कांबळे, निखिल गायकवाड यांनी उपजिल्हाधिकारी देशपांडे यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन सादर करुन आरोपी व अन्य फरार आरोपींचा शोध घेवून कठोर शासन करण्याची मागणी केली.>> चंद्रपूर मद्य घोटाळा… पुढे काय
भविष्यात अशा प्रकारच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी शासनस्तरावरून ठोस उपाययोजना व महिला, युवतींना संरक्षण देण्याकरिता शासनाने कठोर कायदा अंमलात आणुन आरोपींवर फास्ट्रॅक कोर्टाव्दारे सुनावणी घेवून शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी मातंग समाज बांधवांनी या निवेदनाव्दारे केली आहे.