Monday, March 17, 2025
HomeEducationalगुरुदास कामडी 'भारत शिक्षणरत्न पुरस्कार' ने सन्मानित

गुरुदास कामडी ‘भारत शिक्षणरत्न पुरस्कार’ ने सन्मानित

Gurudas Kamadi honored with ‘Bharat Shikshan Ratna Award’
Real Indo Global Vision Social Development Gurukul Foundation Dhule

चंद्रपूर :- समाजासाठी समपर्ण करणारा माणूस उभा करण्याच काम शिक्षक करित असतो. माणसाच्या संवेदना भिडल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करित आहे. पुरस्कार व्यक्तीचा नसून त्यानी केलेल्या कार्याचा गोरव आहे. राष्ट्र निर्माण करणारा शिक्षक आहे. असे अध्यक्ष डॉ. मनोहर पाटील यांनी व्यक्त केले.

रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट फाऊंडेशन धुळे यांच्या कडून दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक व क्रीडा क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींना भारत शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा जी.बी मुरारका कला व वाणिज्य महाविद्यालय शेगाव येथे दिनांक 28 जुलै 2024 रोजी संपन्न झाला.

राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. मनोहर पाटील, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद पवार प्रशाकीय अधिकारी डॉ. प्रविण गिरसे, डॉ. संभाजी पाटील, डॉ. स्विटी बोस, डॉ. डी.एस.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या वर्षीचा भारत शिक्षण रत्न पुरस्कार गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद तथा अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांना देण्यात आला. Real Indo Global Vision Social Development Gurukul Foundation Dhule

गुरुदास कामडी हे सन्मित्र सैनिकी विद्यालय चंद्रपूर येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
उच्च शिक्षण व माध्यमिक शिक्षण यावर केलेले कार्य व भटके – विमुक्त समाज प्रबोधन व विद्यापीठा क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फांऊंडेशन धुळे यांच्या कडून भारत शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसगी सो.संगिता कामडी व गुरुदास कामडी यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून सपत्निक सत्कार करण्यात आला. Gurudas Kamadi honored with ‘Bharat Shikshan Ratna Award’

स्वतःसाठी जगतो तो मृत असतो. जो दुसऱ्या साठी जगतो तै र्कितीमान होतो. स्वतः साठी नाही तर समाज व राष्ट्रासाठी जगण्याची प्रेरणा निर्माण केली पाहिजे. अशी भावना डॉ. डी.एस पाटील यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन राज्यगीत व राष्ट्रगीताने झाला. प्रास्ताविक डॉ. संभाजी पाटील यांनी केले.

भारत शिक्षण रत्न या पुरस्काराने गुरुदास कामडी सन्मानित केल्या बद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे,व्यवस्थापन परिषद सदस्य स्वप्निल दोंतुलवार, डॉ. संजय गोरे, डॉ. लेमराज लडके, डॉ. विवेक गोर्लावार, डॉ. नंदाजी सातपुते, प्रशांत दोंतुलवार, डॉ. रजनाताई लाड, प्राचार्या अरुधंती कावडकर, सिनेट सदस्य संजय रामगिरवार, प्रा.धर्मेंद्र मुनघाटे, यश बांगडे, सौ.किरणताई गजपुरे,स्वरूप तारगे आदींनी अभिनंदन कले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular