gun shot from the roof of the house into the house; Villagers estimate of police firing practice चंद्रपूर :- पोलिसांकडून फायरिंगची प्रॅक्टिस होत असताना बंदुकीची गोळी चक्क एका घराच्या छतातुन घरात शिरल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरा नजीक असलेल्या देऊळवाडा या गावात घडली.
या घरातील अंगणात एक महिला सोयाबीन गाळत होती. तर तिची मुलगी घरात झोपलेली होती. मात्र ही गोळी छतात शिरल्याने कोणालाही इजा न झाल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे देऊळवाडा येथील ग्रामस्थ चांगले हादरले आहे. ही गोळी पोलिसांच्या फायरिंगची असल्याचा गावकऱ्यांचा अंदाज आहे.A gun shot from the roof of the house into the house; Villagers estimate of police firing practice

मात्र सरावातील बंदुकीच्या गोळीची इतक्या अंतरावर जाऊ शकत नसल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. फायरिंग एक्सपर्ट चा अहवाल प्राप्त झाल्यानंतर असं काही आढळल्यास हा फायरिंग सराव बंद करण्यात येईल असेही पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
भद्रावती शहराच्या विंजासन टेकडीवर पोलिसांचा फायरिंग करण्याचा सराव सुरू आहे. हा सराव सुरू असताना देऊळवाडा येथील मधुकर पारखी यांच्या घरात मोठा आवाज झाला. या आवाजामुळे गावकरी त्यांच्या घराकडे धावले त्यावेळी घराच्या छतातील टिनाला छिद्र पडल्याचे दिसून आले. व बंदुकीची गोळी आढळून आली.
या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना देण्यात आल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांची विचारपूस करून गोळी घेऊन निघून गेले. घटनेच्या वेळी घरात मुलगी झोपलेली होती व घराच्या अंगणात घरातील लोक सोयाबीन गाळत होते. मात्र सुदैवाने या घटनेत अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेचा अधिक तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
“देऊळवाडा हे गाव फायरिंग ठिकाणावरुन तिन किलोमीटर दुर आहे. बंदुकिच्या गोळीची इतकी लांब रेंज नाही. मात्र आम्ही या घटनेचा तपास करीत असुन तसे काही आढळल्याचे फायरींगचा सराव बंद करावी लागेल. असं काही होत असल्यास गावातील लोकांना इजा होण्याची शक्यता आहे. आजही टेकडीवर फायरिंग आम्ही केली आहे. तपासा दरम्यान असे आढळल्यास आम्ही फायरिंग तात्काळ बंद करू.’
– आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा