Thursday, February 22, 2024
Homeउद्योगग्रेटा एनर्जी लि. कंपनीकडून फसवणुक केलेल्या पीड़ित नवउद्योजकाला तात्काळ नुकसान भरपाई द्या

ग्रेटा एनर्जी लि. कंपनीकडून फसवणुक केलेल्या पीड़ित नवउद्योजकाला तात्काळ नुकसान भरपाई द्या

Greta Energy Ltd.  Provide immediate compensation to the aggrieved entrepreneur who has been defrauded by the company

◆ शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदनाद्वारे मागणी

चंद्रपुर :- मुल येथील ग्रेटा एनर्जी लि. कंपनीने फ्लाय अँश हॅंन्डलींग कामाचा पाच वर्षाचा करार सुशिक्षित बेरोजगार गणेश पुलगमवार यांना देवून देखील करारानुसार काम न दिल्यामुळे कंपनीकडून 27 लाख रूपये तसेच याव्यतिरिक्त शारिरीक व मानसिक त्रासापोटी 50 लक्ष रुपए अतिरिक्त नुकसान भरपाई तात्काळ मिळवून देण्यात येण्याची मागणी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

मूल तालुक्यातील आकापुर एमआयडीसी मध्ये सुरु असलेल्या ग्रेटा एनर्जी लि. कंपनी प्रकल्पात अनेक नवउद्योजक सुशिक्षित बेरोजगारांना जिल्हा प्रशासनाच्या प्रोत्साहनामुळे काही कामे मिळाली होती. त्यातच फ्लाय अँश हॅंन्डलींगचे काम अथक प्ररिश्रमानंतर राजुरा येथील गणेश पुलगमवार यांना मिळाले होते.

सन 2018 मध्ये कामाच्या सुरुवातीला कंपनीने अँश हॅन्डलींगसाठी दरमहा 1.20 लक्ष रुपए देत होती. करारानुसार 1 वर्ष हे काम सुरळीत चालले. 5 वर्षाचा करार होता. दरम्यान कंपनी प्रशासनाने नवउद्योजक गणेश पुलगमवार यांना वेगवेगळया सबबी लावून त्रास देणे सुरु करुन कंपनीने नंतर अँश हॅन्डलींगचे काम मोफत करण्याचे आदेश दिले. ते ही मान्य करुन 6 महिने हे काम निःशुल्क केले. परंतु कंपनीचे त्रास देणे काही बंद झाले नाही. कंपनीने 3 महिन्यात वीज विभागाची परवानगी, जलपूरवठा यंत्रणा इत्यादी लावून ब्रिक्स प्लांट टाका, स्प्रींकलींग करा असा ससेमीरा लावला. करारकर्ते गणेश पुलगमवार यांनी खूप प्रयत्न केले. परंतु इतर सर्व बाबींची जुळवाजुळव झाली, मात्र वीज विभागाची परवानगी दिलेल्या वेळेत मिळू शकली नाही. त्यामुळे ग्रेटा एनर्जी लि. कंपनीने सदर काम बंद केले. 5 वर्षाच्या कराराचे काम 6 महिन्यात गुंडाळण्यात आले. जेव्हा की, करारकर्ते गणेश पुलगमवार यांनी तो पर्यंत प्रचंड परिश्रम करुन कंपनीची अँश हॅंन्डलींग प्रणाली, परिवहन, उपयोग इत्यादी सर्व टृॅक वर आणून दिले होते. दरम्यान कंपनीच्या कामासाठी करारकर्ते गणेश पुलगमवार यांनी जेसीबी, हायवा टृक, ब्रिक्स प्लांट यंत्र सामुग्री, पाणी पुरवठा आणि वीज विभागाचे मिटर इत्यादी सह दैनिक प्रवास असा लाखोंचा खर्च केला. एवढे सर्व केल्यावर अचानक कंपनीने काम हिसकावून घेतले.

दरम्यान करारानुसार 2019 ते 2023 पर्यंत कंपनीने करारकर्ते गणेश पुलगमवार यांच्या कामावर कंपनीने सुमारे 2 कोटी रुपए मुनाफा कमावला त्यातून करारकर्ते पुलगमवार यांना नुकसानभरपाई स्वरुपात 27 लक्ष रुपए परतफेड करावी. तसेच याव्यतिरिक्त शारिरीक व मानसिक त्रासापोटी 50 लक्ष रुपए अतिरिक्त देण्यात यावे.

काम अचानक काढून टाकल्याने करारकर्ते गणेश पुलगमवार यांची मानसिक स्थिती सुध्दा बिघडत चालली असल्यामुळे ग्रेटा एनर्जी लि. कंपनीवर करारभंग केल्याप्रकरणी तसेच वेगवेगळया कारणांनी त्रास दिल्याप्रकरणी सदरहूं नुकसान भरपाई तात्काळ मिळवून देण्यात यावी आणि भविष्यात कंपनीत काम करणा-या नवतरुणांसोबत सौहार्द्रपूर्ण व्यवहार करण्याची ताकिद द्यावी,

अन्यथा नाइलाजास्तव सदर प्रकरण आम्हाला शिवसेनेच्या पध्दतीने आंदोलन करुन हाताळावे लागेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल.अशी मागणी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular