Greetings to Rajiv Gandhi on his death anniversary on behalf of Rajura Congress
चंद्रपूर :- भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी Rajiv Gandhi यांच्या पुण्यतिथी निमित्त चंद्रपूर काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांचे जनसंपर्क कार्यालय, श्रीराम मंदिर जवळ आशिफाबाद रोड राजुरा येथे राजुरा तालुका आणि शहर काँग्रेसच्या वतीने श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, अँड. सदानंद लांडे, अँड अरूण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, साईनाथ बतकमवार, माजी नगरसेवक आनंद दासरी, अशोक रेचनकर, विनोद नागापुरे, संतोष बंडावार, पंढरी चन्ने, धनराज चिंचोलकर, महादेव ताजणे, उमेश गोरे, भुषण बानकर, इरशाद शेख, सय्यद साबिर, आकाश मावलीकर, सुमित काळे, अनिल कोरडे यासह राजुरा तालुका आणि शहर काँग्रेससह काँग्रेसच्या विविध फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.