Greetings to Krantijyoty Savitribai Phule on behalf of Mahila Congress
चंद्रपूर :- ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदिरा जिनिंग राजुरा येथे महिला काँग्रेसच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, अशोकराव देशपांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा निर्मला कुळमेथे, शहराध्यक्षा संध्याताई चांदेकर, उईके सर, सोनापूरचे सरपंच जंगु पाटील येडमे, आर्वीचे सरपंच सुरज माथनकर, पुनम गिरसावळे, वर्षा कानकाटे, बनकर ताई यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.