Greetings to Babasaheb from Aam Aadmi Party on the 67th Mahaparinirvana Day
चंद्रपूर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनी आम आदमी पार्टी बल्लारपूर चे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात शहरातील नगरपरिषद चौकातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळेस जिल्हा संघठनमंत्री नागेश्वर गंडलेवार, शहर सचिव ज्योतीताई बाबरे, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, सहकार आघाडी अध्यक्ष अजयपाल सूर्यवंशी, अनु.जमाती शहराध्यक्ष अतुल मडावी, अनु. जाती शहराध्यक्ष गुरुदेव अवथरे, रेखाताई भोगे, स्मिताताई लोहकरे,मीनाताई पखाले, प्रज्वल चौधरी तसेच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.