Greetings on behalf of Aam Aadmi Party on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar’s 67th Mahaparinirvana Day
चंद्रपूर : आज विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चंद्रपूर शहरातील आम आदमी पार्टी च्या वतीने गांधी चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले.
या वेळेला आम आदमी पक्षाचे नेते सुनील मुसळे यांनी आपले मत मांडताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाजातील सर्व घटकांना माणूस म्हणुन जगण्याचा हक्क अधिकार मिळवून देण्याचे त्यांनी काम केले. कामगारांपासून स्त्रिया पर्यंत सर्व अधिकार संविधानामध्ये त्याची तरतूद करून जगाला हेवा वाटावा असे सुंदर संविधान त्यांनी या देशाला दिले. असे महामानवाचे उपकार मानावे तेवढे कमी आहे म्हणून केवळ देशात नाही तर जगामध्ये या महामानवाला मागणारे अनुयायी पाहायला मिळतात.
तसेच जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आम आदमी पक्ष हा बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावरती काम करत असून येणारा काळ हा सुशिक्षित युवांचा तथा आम आदमी पक्षाचा असेल असे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
या वेळेला वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा संघटन मंत्री भिवराज सोनी, जिल्हा कोषाध्यक्ष सरफराज शेख, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मधुकर साखरकर, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर, महानगर कोषाध्यक्ष स्वप्नील घाघरगुंडे, मंगला मुके, नागसेन लाभाने इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.