Great contribution of Krantijyoti Savitribai Phule to Bahujan society – Dr. Ashok Jivatode
Krantijyoti Savitribai Phule’s birth anniversary celebrated as ‘Women’s Education Day

विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात स्त्री शिक्षण, स्त्री शक्ति व स्त्री सन्मान कार्यक्रम संपन्न
चंद्रपूर :- स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, स्त्रीयांच्या मुक्तीदात्या, प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणातील योगदान खूप मोठे आहे. त्यांनी दिलेले शैक्षणिक योगदान, त्यांनी आचरणात आणलेली स्री उद्धारासाठीची मुल्ये व त्यांनी रुजवलेली शैक्षणिक मूल्ये पुढील पिढीत संक्रमित करण्यासाठी ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस राज्यात ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. याच धर्तीवर विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक जनता महाविद्यालयाच्या ‘श्री-लीला’ सभागृहात आज (दि.३) ला स्त्री शिक्षण, स्त्री शक्ति व स्त्री सन्मान कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, सामाजिक कार्यकर्त्या ऍड. सौ. सारिका संदुरकर, सौ. सविता कांबळे, सौ. वर्षा गिरडकर, सौ. कविता रंगारी आदी प्रमुख उपस्थित होते.
जीवतोडे कुटुंब हे स्वातंत्र्यानंतर पासून शिक्षण क्षेत्रात भरीव असे कार्य करीत आहे. पूर्व विदर्भात १९५३ पासून चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्त्री-पुरुषांना शिक्षित तथा उच्च शिक्षित केले आहे. महाराष्ट्रात फुले दाम्पत्यांनी शिक्षणासाठी केलेले कार्य हे जीवतोडे कुटुंबीयाकरीता प्रेरणास्थानी आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे बहुजन समाजाकरीता मोठे योगदान आहे, असे यावेळी डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.
महिलांनी शिक्षण, शक्ती व सन्मानाचा पुरस्कार केला पाहिजे. शिक्षण घेवून शक्ती वाढवावी व त्यातून समाजात सन्मानपूर्वक जीवन अंगिकारावे, हे आजच्या दिवसाचे महत्व असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी सौ. मंजुळा डूडूरे, सौ. जोत्सना लालसरे, सौ. विद्या शिंदे, सौ. शीतल गोमकर, सौ. मनीषा जेनेकर, सौ. ज्योती पायघन, सौ. मीना गोहोकार, सौ. मीनाक्षी मोहितकर, सौ. ममता मोहितकर, सौ. शिल्पा ठाकरे, सौ. मनीषा भोयर, सौ. कांचेवार, सौ. सारडा, सौ. शिल्पा रंगारी, ऊरकुंडे, सौ. योगिता रायपूरे, सौ. सिडाम, सौ. माऊलिकर, सौ. आयुषी काळे, यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षिका, युवती व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.