Sunday, April 21, 2024
HomeEducationalआमदार चषक, राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे भव्य आयोजन ; आमदार सुधाकर अडबाले यांची...

आमदार चषक, राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे भव्य आयोजन ; आमदार सुधाकर अडबाले यांची संकल्पना

Grand organization of MLA Cup, state level hockey tournament
Concept of MLA Sudhakar Adbale

चंद्रपूर :- चंद्रपुरातील क्रिडा प्रेमिंचा उत्साह बघता आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale यांच्या संकल्पनेतून आमदार चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. state level hockey tournament

या स्पर्धेचे उद्घाटन आज मंगळवारी 5 मार्च रोजी चंद्रपूर शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या पटांगणावर होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला आमदार सुधाकर अडबाले, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार, कमांडर देवासिस जेना, प्रशासकीय अधिकारी सैनिक स्कूल, सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक राजेश गौतम, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन राखुंडे, उपाध्यक्षा हॉकी महाराष्ट्र सौ. मनीषा आखरे आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. MLA Cup

खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होणाऱ्या या हॉकी स्पर्धेत जिल्ह्यासह राज्यातील विविध हॉकी संघानी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीचे अध्यक्ष प्रेम गावंडे, उपाध्यक्ष अभिजित दुर्गे, सचिव अनिल ठाकरे, निलेश शेंडे आणि रूपेशसिंह चौव्हण यांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular