Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
Homeआमदारआ. सुभाष धोटेंच्या हस्ते भव्य वैद्यकीय व दंत शिबीराचे उद्घाटन.

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भव्य वैद्यकीय व दंत शिबीराचे उद्घाटन.

Grand medical and dental camp inaugurated by MLA Subhash Dhote.

चंद्रपूर :- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत भव्य वैद्यकीय व दंत शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे करण्यात आले होते. सकाळी १० : ४५ वाजता या शिबिराचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की क्षेत्रातील आरोग्य व्यवस्था कार्यक्षम करण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक जबाबदारीने लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या आरोग्य शिबीराचे आवश्यकतेनुसार आयोजन करून अधिकाधिक रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे. ज्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर मदत होईल. Grand medical and dental camp inaugurated by MLA Subhash Dhote.


या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, प्रमुख अतिथी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके, तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, मुख्याधिकारी सुरज जाधव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वि. म. डाखोडे, नि. वै. अ. डॉ. हेमचंद्र कन्नाके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे यासह उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील सर्व डाॅक्टर्स, परिचारिका, कर्मचारी आणि शिबिरासाठी आलेले नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular