Grand Health Checkup and Cancer Diagnosis Camp of Chandrapur Thermal Power Station Employees Cooperative Credit Institution
चंद्रपूर :- चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.ऊर्जानगर Cstps यांनी जागतिक कर्करोग दिन व छत्रपती शिवाजी महाराज Shivaji Maharaj जयंती प्रित्यर्थ, भव्य आरोग्य तपासणी व कॅन्सर निदान शिबीर दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोज रविवारला आयोजित करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जोपासुन, संस्थेचे सभासद व त्यांच्या परिवाराचे आरोग्य निदान करण्याच्या उद्देशाने हे शिबीर आयोजीत करण्यात आले.

शिबीरामधे विविध रक्त तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, तसेच MOC (Cancer Research Centre) कडुन महिला व पुरुषांची कॅन्सर चाचणी अगदी अल्प शुल्कात उपल्बध करुन देण्यात आले. शिबीरामध्ये ३०० पेक्षा जास्त लोकांनी विविध चाचण्या करत, १०० हुन जास्त महिलांनी कॅन्सर निदान चाचणी करत या शिबीराचा लाभ घेतला.
शिबीरामधे विशेषत: कर्करोग निदान व लोकांमध्ये जागरुकता यावी यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून चं.औ.विज केंद्राचे मुख्य अभियंता- श्री.गिरीष कुमरवार साहेब, त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती, उपमुख्य अभियंता- श्री.शाम राठोड साहेब, कल्याण अधिकारी-श्री.दिलीप वंजारी साहेब, वैद्यकीय अधिकारी- डाॅ.निलेश उपलोपवार सर, अधिक्षक अभियंता- श्री.अविनाश वट्टी साहेब, कार्यकारी अभियंता- श्री.सुधाकर चव्हाण साहेब, डाॅ.सुमेर रामावतसर, डाॅ.कावळेसर, सेवन स्टार हॉस्पिटल नागपूर SEVEN STAR Hospital, Nagpur डाॅक्टरांचा चमु, MOC चे डॉ.दिनेश कापघाटेसर उपस्थित होते.
शिबिरामध्ये विविध चाचण्या व तज्ञांच्या सल्ल्यानुसार लोकांमध्यें जागरुकता निर्माण व्हावी असे कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.कुमरवार साहेब यांनी आपल्या भाषणामधे सांगितले.
शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता चं. औ. वि. कें. क. सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष- रविंद्र बोबडे, उपाध्यक्ष- विजय राठोड, सचिव- चेतन वानखेडे, सहसचिव- कवीता नवघरे, संचालक मंडळ- रोहिणी पिदुरकर, संजय उंदिरवाडे, प्रशांत सोनोने, सुरज मसराम, विलास निपाणे, अनील दौडकर, सागर कलोरे व व्यवस्थापक पंजाब गांजरे व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.