Grand blood donation camp tomorrow under ‘Blood for Babasaheb’ campaign
चंद्रपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाणदिनी ब्लड फॉर बाबासाहेबअंतर्गत जगभरात पाचशेवर ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, चंद्रपुरातही विविध संघटनांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ. सिराज खान यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रपुरात महार रेजिमेंट आणि माजी सैनिक संघटना चंद्रपूर, भूमीअभिलेख कर्मचारी संघटना, योग्यनृत्य परिवार चंद्रपूर, डॉ. आंबेडकर विचारसंघ, चंद्रपूर मुस्लीम मोर्चा, भूमिपुत्र ब्रिगेड या संघटनांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील बहुजन, दिनदलितांच्या विकासासाठी केलेले अपार कष्ट, त्याग आणि समर्पणाची जाण राखून या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पत्रकार परिषदेला बाळू रामटेके, मंगेश खोब्रागडे, रोशन अलोणे उपस्थित होते.