Friday, March 21, 2025
HomeSocialगाव स्वच्छ, सुंदर बनवून ग्रामजयंती साजरी करावी - ॲड. राजेंद्र जेनेकर

गाव स्वच्छ, सुंदर बनवून ग्रामजयंती साजरी करावी – ॲड. राजेंद्र जेनेकर

Gram Jayanti should be celebrated by making the village clean and beautiful – Adv.Rajendra Janekar :                            Gram Jayanti festival was held in Kohpara

चंद्रपूर :- राजुरा तालुक्यातील कोहपरा येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ व गावकरी मंडळीचे वतिने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे Rashtrasant Tukdoji Maharaj जन्मदिवस अर्थात ग्रामजयंतीचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाध्यक्ष म्हणून ॲड.राजेंद्र जेनेकर केंद्रीय सदस्य श्रीगुरुदेव प्रचार विभाग गुरुकुंज आश्रम तर प्रमुख अतिथी म्हणून कविता बोंडे पोलीस पाटील, पुजा मडावी उपसरपंच, बळीराम बोबडे, मारोती सातपुते गुरुजी, विठ्ठलराव मुसळे, गजानन उलमाले, पुरुषोत्तम विद्दे, मदन कुळमेथे, सारिका बोढे, माया फोफरे, वंदना मंडरे, शैलेश कावळे, गजानन बोबडे, मोहन वडस्कर, विनायक सोयाम, अनिल पिदूरकर शाखाध्यक्ष आदींची उपस्थिती होती.

सर्वधर्मीय अधिष्ठान, राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज पुर्णाकृती पुतळा, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन उदघाटन करण्यात आले, Gram Jayanti festival

प्रस्तविकपर भाषण श्रीकृष्ण पिंगे यांनी केले, सामुदायिक प्रार्थनेचे महत्वावर मारोती सातपुते यांनी मार्गदर्शन केले, याप्रसंगी विनायक सोयाम प्रचारक, कवीता बोंडे, शैलेश कावळे, गजानन बोबडे यांनी समयोचित विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाध्यक्ष ॲड.राजेंद्र जेनेकर यांनी गाव स्वच्छ,सुंदर बनवून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची ग्रामजयंती साजरी करावी, चांगले प्रचारकांची श्रीगुरुदेव सेवा मंडळामध्ये महत्वपूर्ण भुमिका असते त्यामुळे सामाजिक सलोखा व स्वच्छता कायम राहू शकते असे विचार व्यक्त केले.

याप्रसंगी श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे वतीने अतिथींचे हस्ते सक्रिय गावकरी मंडळींचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन व आभार सौ.जयश्री शेरकी यांनी केले,

कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता सिताराम मुसळे, बंडू दासारवार, सिताबाई बोढे, बाळकृष्ण पिंगे, प्रांजली मोरे, सतिश कुळमथे आदींनी परिश्रम घेतले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular