Monday, November 4, 2024
HomeAgricultureएक रूपयात पिक विमा ही सरकारची योजना फसवी
spot_img
spot_img

एक रूपयात पिक विमा ही सरकारची योजना फसवी

Govt’s ‘One Rupee Crop Insurance Scheme’ Fraudulent
Allegation of Bhumiputra Brigade in Press conference

चंद्रपुर (चंद्रपूर टुडे) :- सरकार द्वारे अधिकृत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी द्वारे शेतकऱ्यांनी 1 रूपयात पिक विमा काढला. परंतु पिकांचे नुकसान झाल्यास त्या क्षेत्राचा पंचनामा करने हे ओरिएंटल इन्शुरंस कंपनी अथवा कृषी विभागाचे काम असताना हे काम झेनित सोल्युशन प्रा. लि. कंपनी हे पंचनामा करीत आहे. त्यामुळे पंचनामा करण्यामध्ये सावळागोंधळ होत असुन काही शेतकऱ्यांना विमा लाभ मिळाला तर काही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहिले, त्यामुळे सरकारी 1 रूपयात पिक विमा ही योजना फसवी असल्याचा आरोप भूमिपुत्र ब्रिगेड चे सदस्य विजय मुसळे यांनी गुरूवारी श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रपरीषदेत केला आहे. Govt’s ‘One Rupee Crop Insurance Scheme’ Fraudulent

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत कित्येक शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतमालाचा एक रूपयामध्ये पिक विमा काढला. हा पिक विमा सरकारद्वारे अधिकृत ओरिएंटल इन्शुरंन्स कंपनीद्वारे काढण्यात येत आहे. पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानी नोंद ऑनलाईन पध्दतीने दिलेल्या वेळेच्या आत केली होती. यानंतर पीक विमा राशी मिळण्यास सुरूवात झाली असता मूल तालुक्यातील हळदा गावातील काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला तर काही शेतकरी पात्र असुनही त्यांना लाभ मिळाला नसल्याने याची तक्रार भूमिपुत्र ब्रिगेड चे डॉ. राकेश गावतुरे यांचे कडे केली असता यासंदर्भात कृषी विभाग उपसंचालक चंद्रपुर यांचेकडे विचारणा केली. त्यांनी ओरिएंटल कंपनी कडे विचारणा करण्याची माहीती दिली. Allegation of Bhumiputra Brigade

वास्तविक पंचनामा करण्याचे काम ओरिएंटल कंपनी चे कर्मचारी अथवा कृषी विभाग कर्मचारी यांना असताना हे काम तिसरीच कंपनी झेनित सोल्युशन प्रा. लि. ला दिले. संबंधित तीसरी कंपनीला विचारण केली असता वेळेच्या आत नुकसानीच्या पिकांची नोंद न केल्यामुळे पिक विमासाठी अपात्र असल्याची माहीती दिली. परंतु शेतकऱ्यांनी उपसंचालक कृषी विभाग यांचेसमक्ष वेळेत नोंदणी केल्याचे पुरावे सादर केले. झेनित कंपनी कार्यालयात गेले असता त्याला कुलूप लागलेले असते. त्यामुळे कोणत्या अटीवर शेतक_यांना पात्र अपात्र ठरविण्यात येत आहे याबद्दल कळायला मार्ग नाही तसेच याला जिम्मेदार कोण?असा प्रश्न आता शेतक_यांसमोर उभा आहे.

त्यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत 1 रूपयामध्ये पिक विमा योजना फसवी असल्याचा आरोप भूमिपुत्र ब्रिगेड सदस्य विजय मुसळे यांनी केला आहे.

नुकसानग्रस्त शेतक_यांच्या खात्यात पिक विमा राशी लवकरात लवकर जमा न झाल्यास भूमिपुत्र शेतकरी ब्रिगेड च्या माध्यमानून तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पत्रपरीषदेत भूमिपुत्र शेतकरी ब्रिगेड चे विजय मुसळे, दिपक वाढई, प्रकाश चालुरकर, विक्रम गुरनूले, रितेश मैकलवार आदि उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular