Govt should take initiative to update voter list: Memorandum to District Magistrate
चंद्रपूर :- मागील महिन्यात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात लोकसभेची निवडणूक पार पडली.Loksabha Election अनेक मतदार Voters हे मतदान केंद्रावर गेल्यावर त्यांची नावे मतदार यादीत नसल्याचे त्यांना कळले ही अतिशय धक्कादायक बाब आहे. ज्यांची नावे गेल्या अनेक वर्षांपासून मतदार यादीत आहेत व जे निरंतर मतदार करीत आहेत अश्याही लोकांची नावे मतदार यादीतुन गायब झाली. त्यामुळे याप्रकाराची चौकशी करावी, असे निवेदन भाजपा चंद्रपूर जिल्हा महानगर अध्यक्ष राहूल पावडे यांनी जिल्हाधिका-यांना दिले. Update voter list
याप्रसंगी शहर महामंत्री रामपाल सिंह उपस्थित होते.
मतदार यादया लवकरात लवकर अद्ययावत कराव्या अशी मागणी यावेळी राहूल पावडे यांनी केली. यावेळी या विषयावर मा. जिल्हाधिका-यांशी विस्तृत चर्चा झाली. Statement to District Magistrate Chandrapur