Sunday, April 21, 2024
Homeक्राईमघरफोडीतील सर्राइत गुन्हेगाराकडून सोने चांदीचे दागिने हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

घरफोडीतील सर्राइत गुन्हेगाराकडून सोने चांदीचे दागिने हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Chandrapur Burglary crime news, Gold and silver ornaments seized from house burglar ; Action by local crime branch                           चंद्रपूर :- शहरातील सराई वार्ड येथील घराचे हॉल मध्ये ठेवलेल्या बॅग मधील 2 लाख 14 हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने चोरणारा Burglary Crime आरोपी उमाकांत उर्फ गोलू सुनील उदासी, वय 23 वर्ष, रा. जलनगर, चंद्रपूर याला Lcb Chandrapur स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून 1 लाख 97 हजार पाचशे रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले.

चंद्रपूर शहरातील हॉटल विश्वभारती मागील सराई वार्डातील वर्षा संजय गोडे या दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रात्रो घरात झोपून असतांना त्यांचे पती बाहेरून दरवाजा लावून फ़िरायला गेले असता घराच्या हॉलमध्ये ठरलेल्या बागेतून 2 लाख 14 हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने चोरी गेल्याची घटना घडली, याची तक्रार वर्षा गोडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. Gold and silver ornaments seized from house burglar, Action by local crime branch

चंद्रपुर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत होणाऱ्या घरफोड्या लक्षात घेवून पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी विशेष पथक नेमून घर फोडीचा छडा लावण्याचे निर्देश दिले. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी कौशल्यपुर्ण तपास करून गोपनिय बातमीदारांमार्फत माहिती घेवून रेकॉर्डवरील आरोपी उमाकांत ऊर्फ गोलु सुनिल उदासी, वय २३ वर्ष, रा. संजय मोहल्ला, जलनगर चंद्रपुर यास ताब्यात घेवून सखोल विचारपूस केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागीने असा 1,97500/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. Gold and silver ornaments seized from house burglar, Action by local crime branch

सदर गुन्ह्याचा कौशल्यपुर्ण तपासाची कार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रीना जनबंधु, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोउपनि विनोद भुरले, पोहवा. संजय आतकुलवार, पोशि गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, अपर्णा मानकर यांनी केली असून आरोपीला पुढिल तपासासाठी पोलीस स्टेशन, रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular