Sunday, March 23, 2025
HomeAccidentवाघाच्या हल्ल्यात शेळीपालक ठार : कळमना परिसरात दहशत

वाघाच्या हल्ल्यात शेळीपालक ठार : कळमना परिसरात दहशत

Goat farmer killed in tiger attack
Panic in Kalmana area                          Incident in Ballarpur forest area

कोठारी :- जंगलात बकऱ्या चारायला गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज मंगळवार 14 मे रोजी बल्लारपूर तालुक्यातील कळमना नियतक्षेत्रात घडली. वामन टेकाम वय 59 वर्ष राहणार कोरटी मक्ता असे मृत गुराख्याचे नाव आहे. Tiger Attack

बल्हारपुर तालुक्यातील मौजा कोर्टिमक्ता येथील रहिवासी वामन गणपती टेकाम, वय 59 वर्ष दिनांक 14 मे ला सकाळी 8-30 वाजताचे सुमारास नियतक्षेत्र कळमना वनात बकरी चारण्यासाठी गेला होता. गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना सदर इसम वनात बकरी चारत असल्याचे दिसताच त्यांस वनाच्या बाहेर काढण्यात आले व परत वनकर्मचारी हे गस्तीवर समोर निघुन गेले.

परंतु सदर इसम हा पुन्हा बकऱ्या चारण्यासाठी बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कळमना मधील राखीव वनखंड क्रमांक 514 A मध्ये गेला असता दुपारी 12 वाजताचे सुमारास त्यांचेवर वाघाने हल्ला करुन त्यांस जागीच ठार मारल्याची घटना घडली. Tiger killed a goat farmer

घटनेची माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) आपले अधिनस्त वनकर्मचारी यांचे सोबत तात्काळ मौका स्थळी हजर झाले.

मोक्यावर पाहणी केली असता वाघाचे हल्यात वामन गणपती टेकाम यांचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले.

त्याक्षणी मृत व्यक्तीचे शव ताब्यात घेवुन पोलीस विभागाचे कर्मचारी व मृत व्यक्तीचे नातेवाईक यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन शव शवविच्छेदना करीता पोलीस विभागाचे ताब्यात देण्यात आले. व मृत व्यक्तीचे नातेवाईकास तात्पुरती पन्नास हजार सानृग्रह आर्थिक मदत देण्यात आली.

सदर परिसरात गस्त वाढणविण्यात आलेली असुन वाघाचा मागोवा घेण्याकरीता 20 ट्रॅप कॅमेरे व 1 Live कॅमेरा लावण्यात आलेलाआहे.

सदर प्रकरणात पुढील कार्यवाही मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह नरेश भोवरे करीत आहेत.

बल्हारशाह कळमना जंगल परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे नागरीकांनी वनात प्रवेश करु नये असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात येत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular