Give free medicines to Chandrapur District General Hospital or protest; Warning of Vanchit Bahujan Aghadi Chandrapur
चंद्रपूर :- जिल्हा सामान्य रुग्णालय येथे, गावातील, ग्रामीण भागातील तसेच शहरातील रुग्ण येतात. परंतु या रुग्णांचा नातेवाईकांना बाहेरुन औषधे आणण्यासाठी दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी चिट्टी लिहुन देतात. या नातेवाईकांना नाईलाजाने उपचार घेत असलेल्या रुग्णांना कडे पाहून औषधे आणावी लागते.
वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष धर्मेंद्रभाऊ शेंडे व घुग्घुस शहर अध्यक्ष शरदभाऊ पाईकराव यांच्या लक्षात हे येतातच रुग्णावरती हे अत्याचार व शोषण होत असल्याने आपण या बाबीला गांभीर्याने दखल घेतली पाहिजे म्हणून दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोज शुक्रवार ला वंचित बहुजन आघाडी तालुका, व घुग्घुस शहराचा माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलिंद कांबळे साहेब, व जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी केली की लवकरात लवकर हा भोंगळ कारभार बंद करून गोरगरीब व गरजू रुग्णांना औषधे ही मोफत मिळाली पाहिजे व प्रसूती माता जेव्हा ऑपरेशन थिएटर मध्ये असता त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे आणण्यासाठी पाठवितात हे सर्व बंद झाले पाहिजे व सर्व रुग्णांना औषधे ही मोफत मिळाली पाहिजे अन्यथा या विषयाला घेऊन आम्ही शासन प्रशासन विरोधात तीव्र भुमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल अशा इशारा देखील यावेळेस निवेदनातून देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव एँड. अक्षय लोहकरे, तालुका अध्यक्ष धर्मेंद्रभाऊ शेंडे, घुग्घुस शहर अध्यक्ष, शरदभाऊ मल्हारी पाईकराव, उपाध्यक्ष जगदीश भीमसेन मारबते, संघटक, राकेश अशोक पारशिवे पंडित दुरुतकर आदी उपस्थित होते.