Saturday, January 18, 2025
HomeCrimeअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या

Give capital punishment to minor girl rapist – Chandatai Vairagade
Protest movement by Chandrapur City Mahila Congress

चंद्रपूर :- बदलापूर येथील दोन अल्पवयीन शाळकरी मुलीवर अतिशय क्रूर पने शाळेतील सफाई कर्मचाऱ्यांनी लैगिक अत्याचार केला ही आपल्या राज्यातील अतिशय निंदनीय  दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील जनतेमध्ये या सरकार विषयी द्वेष निर्माण झाला आहे, तसेच कलकत्ता येथे सुद्धा प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर वर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या दोन्ही घटना अतिशय क्रूर पने झाल्या अश्या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियाना न्याय देण्याची भूमिका न घेता हे ढोंगी केंद्र आणि राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे अश्या ढोंगी सरकारचा चंद्रपूर शहर महिला काँग्रेस तर्फे जाहीर निषेध करून अत्याचार करणाऱ्याला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून करीत असल्याच्या संतप्त भावना चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा चंदाताई वैरागडे यांनी व्यक्त केल्या,

याप्रसंगी डाँ अभिलाषा गावतुरे यांनी मुलींवर आणि डाँ महिलेवर झालेले अत्याचार या दोन्ही घटना अतिशय निंदनीय असून महिलामध्ये अतिशय भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, महिलांच्या सुरक्षेकडे केंद्र आणि राज्य सरकार जाणीवपूर्वक डोळे झाक करीत असल्याचे मत व्यक्त केले,

निषेध आंदोलनाला डाँ विश्वास झाडे, अश्विनी खोब्रागडे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, ऍड प्रीती शहा यांनी सुद्धा देशात आणि राज्यात सतत महिलांवर अत्याचार होत असल्यामुळे आजची महिला सुरक्षित नाही तरी देखील राज्य व केंद्र सरकार कुठलीच ठोस भूमिका घेत नाही अश्या सतंप्त भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्र प्रदेश महिला काग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांचे निर्देशानुसार गांधी चौक चंद्रपूर येथे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रामूभाऊ तिवारी यांचे प्रमुख उपस्थितीत, चंद्रपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांचे नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले,

आंदोलनात डाँ विश्वास झाडे, डाँ अभिलाषा गावतुरे, अश्विनी खोब्रागडे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, प्रसन्न शिरवार, छाया सोनुले, संगिता पेटकुले, सकिना अन्सारी, शालिनी भगत ,सुनंदा धोबे, रेखा वैरागडे, विद्या गड्डमवार, मीनाक्षी गुजरकर, मुन्नी शेख, संध्या पिंपळकर ,अर्चना ठाकरे, कविता दिकोंडावार, प्रगती भोसले, राहुल चौधरी, भालचंद्र दानव, पप्पू सिद्धीकी ,नौशाद शेख, बादल पॉल, यांचेसह महिला काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular