Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomeEducationalक्रीडा क्षेत्रातून भविष्यातील संधी मिळवा - आमदार सुधाकर अडबाले ; राज्‍यस्तरीय हॉकी...

क्रीडा क्षेत्रातून भविष्यातील संधी मिळवा – आमदार सुधाकर अडबाले ; राज्‍यस्तरीय हॉकी स्पर्धेत (मुले) भुसावळ संघाचा विजय

Get future opportunities from sports sector: MLA Sudhakar Adbale
Bhusawal team wins in state level hockey tournament (boys).

चंद्रपूर :- हॉकी व विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केल्यास शैक्षणिक गुणवत्तेसह नोकरीमध्ये देखील प्राधान्य मिळते. यामुळे क्रीडा स्पर्धेमध्ये नैपुण्य मिळवावे, असे आवाहन आमदार सुधाकर अडबाले यांनी नुकतेच चंद्रपूर येथे आयोजित राज्‍यस्‍तरीय आमंत्रित हॉकी स्‍पर्धेच्या (मुले) समारोपीय कार्यक्रमात बोलताना केले.

हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर व डेव्‍हलपमेंट ॲन्‍ड रिसर्च एज्‍युुकेशन सोसायटी (ड्रिम) चंद्रपूर यांच्या संयुक्‍त विद्यमाने आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने ‘आमदार चषक’ राज्‍यस्‍तरीय आमंत्रित हॉकी स्‍पर्धा (मुले) लोकमान्य टिळक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, जिल्‍हा स्‍टेडीयमच्‍या बाजूला चंद्रपूर येथे पार पडली. या स्‍पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मुलांचे संघ सहभागी झाले होते.

मुलांच्या गटात भुसावळ आणि अमरावती संघात अंतिम सामना रंगला. अतिशय चुरशीच्या सामन्‍यात भुसावळ संघाने अमरावती संघाचा ७-४ ने पराभव केला. तर तिसऱ्यास्‍थानी चंद्रपूर संघाने बाजी मारली. मुलांच्या गटात प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्‍या संघाला ट्राफी, रोख आणि मेडल देऊन आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्‍ते सन्‍मानित करण्यात आले. तर उत्‍कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेस्‍ट स्‍कोरर, बेस्‍ट किपर, बेस्‍ट फॉरवर्ड, बेस्‍ट डिपेंडर, बेस्‍ट प्‍लेअर ऑफ फायनल मॅच, बेस्‍ट प्‍लेअर ऑफ द टुर्नामेंट म्‍हणून खेळाडूंना गौरविण्यात आले.

आमदार अडबाले म्हणाले, “क्रीडा स्पर्धा केवळ मनोरंजनासाठी नाहीत तर त्यातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना मिळते. शिस्त, नेतृत्वगुण आणि संघभावना यांसारख्या महत्त्वपूर्ण गुणांचा विकासही या स्पर्धांमुळे होतो.”

यावेळी सुरेंद्र अडबाले, अरविंद दिक्षीत, प्रा. रवी झाडे, दिनकर अडबाले, सचिन मोहीतकर, प्रेम गावंडे, अभिजीत दुर्गे, निलेश शेंडे, रुपेशसिंह चौव्हाण, प्रभाकर टोगर, संध्या टोगर, अमोल सदभैय्ये, पंकज सदभैय्ये, आकाश इंगळे, लोकेश मोहुर्ले, दिनेश सावसागडे, सिद्धार्थ सूर्यवंशी, शुभम पुणेकर, शुभम साखरे, भारत विरुटकर, अपूर्व कुळसंगे, सोनाली गावंडे, आईशा खान, प्रियंका मंडळ, श्रुती भारती, निधी झाडे, समृद्धी गेडाम, शर्वरी लाभणे, करिष्मा राजपूत, दिक्षा चुनारकर आदींची उपस्‍थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular