Tuesday, March 25, 2025
HomeEducationalडॉ. गंगाराम अहीर चॅरीटेबल ट्रस्ट व कमल स्पोर्टीग क्लबद्वारा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव...

डॉ. गंगाराम अहीर चॅरीटेबल ट्रस्ट व कमल स्पोर्टीग क्लबद्वारा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

Dr. Gangaram Ahir Charitable Trust and Kamal Sporting Club organized meritorious students felicitation ceremony on 28th July

चंद्रपूर :- शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये 10वी व 12वी च्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. गंगाराम अहीर चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर व कमल स्पोर्टंग क्लब चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने दि. 28 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. meritorious students felicitation ceremony

स्थानिक गंजवार्ड येथील आयएमए (इंडियन मेडीकल असोसिएशन) IMA Hall सभागृहात सकाळी 11 वाजता होणाऱ्या या गुणगौरव सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir राहणार आहेत.

महानगरातील मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमास शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षकवृंदानी बहुसंख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर व क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular