Tuesday, November 5, 2024
HomeCrimeफायनान्स कंपनीचा कर्मचारी असल्याची बतावणी करून वाहने विक्री करणारी टोळी जेरबंद ;...
spot_img
spot_img

फायनान्स कंपनीचा कर्मचारी असल्याची बतावणी करून वाहने विक्री करणारी टोळी जेरबंद ; स्कॉर्पीओ, दुचाकींसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Gang selling vehicles by pretending to be employees of finance company busted: Scorpio, two-wheelers worth lakhs seized

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची धडाकेबाज कामगिरी

चंद्रपुर :- जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अवैध धंद्यांची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश रविंद्रसिंग परदेशी, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, रिना जनबंधू, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक अवैध धंद्यांची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबवित होते.

दरम्यान सदर पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, काही इसमांची टोळी नविन शोरूम विना कागदपत्रांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांची विक्री करून शासनाची तसेच फायनान्स कंपन्यांची फसवणुक करीत आहेत. अशी खात्रिशिर माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदर पथकाने सखोल माहिती मिळवून आशिष रमेश सहारे, रा. सावरगांव, ता. नागभिड, जि. चंद्रपुर, पवन मोहनलाल साहु, रा. संत कबिर चौक, सिंगोडी, ता. अमरवाडा, जि. छिंदवाडा, राज्य मध्यप्रदेश, संदिप चम्हारलाल कनासिया, रा. बनेरा, ता. कटंगी, जि. बालाघाट, राज्य मध्यप्रदेश या तिन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहुन ताब्यात घेण्यात आले.

नमुद इसमांना सखोल चौकशी केली असता सदर आरोपीनी चंद्रपुर जिल्ह्यात अनेक दिवसांपासून विविध कंपनिच्या विना कागदपत्रांच्या दुचाकी चारचाकी वाहनांची विक्री करून शासनाची तसेच फायनान्स कंपनीची फसवणुक केली.

यामध्ये फिर्यादी नामे नारायण मोहन पर्वते, रा. वलनी मेंढा, ता. नागभिड, जि. चंद्रपुर यांची तब्बल १८,००,०००/- रू. ची फसवणूक झाल्याचे स्थागुशा पथकाने त्यांचे लक्षात आणून दिल्याने त्यांनी दिलेल्या फिर्याद वरून पोलीस ठाणे रामनगर, चंद्रपुर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १५/२०२४ कलम ४२०, ४०६, ३४ भादंवि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नमुद आरोपींना ताब्यात घेवून सखोल चौकशी करून चंद्रपुर जिल्ह्यात विक्री केलेल्या १ स्कॉर्पीओ वाहन, १ ट्रॅक्टर, १४ दुचाकी वाहने असे एकुण १६ वाहने किंमत अंदाजे ३२,२०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढिल तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले हे करीत आहेत.

पोलीस अधिक्षक, रविंद्रसिंग परदेशी यांचेतर्फे जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणतेही वाहन खरेदी करतांना शोरूम मधून त्या वाहनाची माहिती घ्यावी, कागदपत्रांची पडताळणी करावी, कोणालाही वाहन मिळवून देतो म्हणून आपले कागदपत्रे देवू नये तसेच या संबंधाने कुणीही आपलेकडे आल्यास तात्काळ संबधित पोलीस स्टेशनला कळवावे,

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि. जितेंद्र बोबडे, सपोनि. नागेशकुमार चतरकर, पोउपनि. विनोद भुरले, पोहवा. दिपक डोंगरे, नापोकॉ. गणेश भोयर, नापोकॉ. संजय वाढई, नापोकॉ. गोपीनाथ नरोटे, पोकॉ. सतीश बगमारे, पोकॉ. प्रदिप मडावी, चापोहवा. दिनेश आराडे, सिसिटीएनएस चे पोहवा गोपाल पिंपळशेंडे, सायबर पोलीस स्टेशनचे अमोल सावे, छगन जांभुळे, प्रशांत लारोकर यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular