Sunday, February 16, 2025
HomeCrimeगडचांदूरातील बॉम्ब बनावटी : दोन संशयित पोलीसांच्या ताब्यात

गडचांदूरातील बॉम्ब बनावटी : दोन संशयित पोलीसांच्या ताब्यात

Gadchandur bomb case fabricated
Two suspects in police custody

चंद्रपूर :- पोलीस स्टेशन गडचांदूर हद्दीतील भगवती इनेक्स दुकानासमोर बॉम्ब सदृश वस्तू ठेवणारे 2 इसमास स्थानिक गुन्हे शाखा व गडचांदूर पोलीस स्टेशनच्या पथकानी काही वेळातच ताब्यात घेतले आहे.

आज दिनांक 30 जुलै रोजी दूपारी दिड वाजताचे दरम्यान चंद्रपुर जिल्हात गडचांदूर शहरातील बसस्टॉप चौकातील भगवती अनेक्स कापड दूकानासमोर बॉम्ब ठेवलेबाबतची माहीती त्या दूकानाचे मालक शिरीष सूर्यकांतराव बोगावार यांना फोनव्दारे मिळाली होती त्यावेळी त्यांनी ठाणेदार पोस्टे गडचांदूर यांना फोनव्दारे माहीती दिली. Chandrapur Crime
त्याचेवरून त्यांनी पोलीस स्टॉप पाठवून त्याचे दूकानासमोर झडती घेतली असता त्या दूकानाचे समोर एक संशयास्पद बॅग दिसून आली त्यामध्ये दूरून पाहिले असता त्यामध्ये लाईट टिपटिप करीत असल्याचे दिसून आले त्यावरून गडचांदूर पोलीस ठाणेदार यांनी सदर माहीती पोलीस अधीक्षक यांना देवून त्याचे सल्याने चंद्रपूर येथील बॉम्ब शोध पथक BDDS यांना दिली. Gadchandur bomb case fabricated

सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस अधिक्षक, चंद्रपुर व अप्पर पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक हे स्वता घटनास्थळी तात्काळ हजर झाले तसेच BDDS पथक चंद्रपूर व गडचिरोली यांना पाचारण करण्यात आले व त्याचे सहाय्याने सदर बॉम्ब Defuse करण्याचे काम राबविले.

दरम्यान आरोपी शोध कामी गडचांदूर पोलीस स्टॉप व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, उपविभाग गडचांदूर मधील वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आली.

त्यावेळी घटनास्थळाबाहेरील CCTV फूटेज व कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन गडचांदूर यांनी 2 संशयीत इसमांना ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचेवर असलेले कर्जामूळे दूकानदार यांना फोनकरून खंडणी मागण्याचे उद्देशाने सदरचे कृत्य केल्याचे कबूल केले.

त्यांनतर BDDS पथक चंद्रपूर व गडचिरोली यांना सदर बॉम्बची Defuse करण्याकामी पाहणी केली असता सदर बॉम्ब हा बनावटी असल्याचे दिसून आले.

सदर प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून पूढील तपास ठाणेदार गडचांदूर हे करीत आहेत. सदरची

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular