Sunday, April 21, 2024
Homeदेशविदेश'मन की बात' मधून प्रधानमंत्री मोदीजींचा देशवासीयांना स्वदेशीचा आग्रह ; भाजपा ओबीसी...

‘मन की बात’ मधून प्रधानमंत्री मोदीजींचा देशवासीयांना स्वदेशीचा आग्रह ; भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगरच्या आयोजनाचा घेतला अनेकांनी लाभ

From Man Ki Baat, Prime Minister Modi’s appeal to countrymen for Swadeshi;  Many people benefited from the organization of BJP OBC Morcha Chandrapur Mahanagar  चंद्रपूर :- मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पम Narendra  Modi यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाचा कार्यक्रम राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सुचनावजा मार्गदर्शनात भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगरच्या वतिने दि. 29 ऑक्टोंबर रोजी मन की बात विश्वकर्मा के साथ या कार्यक्रमाच्या अनुशंगाने आयोजित केला होता. या कार्यक्रमास ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे, युवा नेते रघुवीर अहीर, भाजपा ओबीसी मोर्चाचे महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, प्रदीप किरमे, प्रा. रवी जोगी, मधुकर राऊत, मयुर भोकरे, सुरेश भाकरे, गौतम यादव, राम हरणे, बाळू कोलनकर, मुग्धा खांडे, संजय शर्मा, जितू शर्मा यांचेसह अनेकांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.From Man Ki Baat, Prime Minister Modi’s appeal to countrymen for Swadeshi;  Many people benefited from the organization of BJP OBC Morcha Chandrapur Mahanagar

मा. पंतप्रधान मोदीजींनी आजच्या या संदेशात ‘वोकल फॉर लोकल या संकल्पनेवर भर देत स्वदेशी वस्तूंची खरेदी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे आवाहन केले. त्यांनी सणासुदीच्या काळात स्वदेशी निर्मित उत्पादनाच्या खरेदीवर भर देवून आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचे निर्वहण करण्याचे देशवासीयांना आवाहन केले. प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या संदेशाद्वारे महात्मा गाधीजींच्या जयंतीदिनी नवी दिल्ली येथे एकाच दुकानातून एकाच दिवशी सुमारे दीड करोड़ खादीच्या वस्त्रांची खरेदी करण्यात आल्याचे सांगत हे फार मोठे राष्ट्रहिताचे कार्य असल्याचे सांगीतले.

10 वर्षांपूर्वी 30 करोड रूपयांची खादीची खरेदी आज 1.25 लाख करोड रूपयांच्या आसपास पोहचली असल्याने याचा लाभ शहरांपासून तर गांवापर्यंतच्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहचला असल्याने विनकर, शेतकरी व या व्यवसायाशी निगडीत लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाल्याचे प्रधानमंत्र्यांनी आपल्या संभाषणाद्वारे सांगीतले. देशातील प्रत्येकांनी खरेदी करतांना स्वदेशी वस्तूंची खरेदी करण्याचा प्रण करावा असे आवाहन करून वोकल फॉर लोकल अभियानास लोकांचे समर्थन वाढत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. यामुळे देश आत्मनिर्भरते कडे वेगाने वाटचाल करण्यास समर्थ होईल असेही प्रधानमंत्री म्हणाले. ही खरेदी केवळ सणांपुरती मर्यादीत राहू नये अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी प्रधानमंत्री मोदीजींनी ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियांना अंतर्गत देशाच्या काना कोपन्यातून गोळा करण्यात आलेली पवित्र माती, अमृत कलशाद्वारा एकत्रित करण्यात आली असून विविध राज्य व प्रांतातून हा अमृत कलश यात्रेद्वारे दिल्लीत पोहचत असून या ठिकाणी विशाल भारताची ओळख म्हणून पवित्र अमृत वाटीकेचे निर्माण करण्यात येणार आहे असेही त्यांनी सागीतले. दि. 31 ऑक्टोंबर ही लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तर माजी पंतप्रधान इंदीराजी यांची पुण्यतिथी असून या दिवशी राष्ट्रव्यापी संघटनेची आधारशिला मेरा युवा भारत स्थापित होईल या माध्यमातून देशभरातील युवकांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करून युवकांमध्ये एकजूट निर्माण करण्याचे ध्येय साकार करण्याचा संकल्प असल्याचे प्रधानमंत्र्यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात सांगीतले. त्यांनी आपल्या संदेशातून राष्ट्रोनत्तीच्या कार्यात प्रत्येकांनी आपले योगदान देण्याचे आवाहन करतांनाच अनेक महत्वपुर्ण बाबींवर विस्तारपूर्वक ऊहापोह केला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular